Tuesday, January 21, 2025

आप चे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा शहीद भगतसिंगांच्या गावात शपथविधी

भगतसिंगच्या विचाराने काम करू – भगवंत मान

चंदिगड : भगवंत मान यांनी आज पंजाबचे 17 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी पंजाबच्या जनतेचे आभार मानले. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि आपचे इतर नेते देखील उपस्थित होते. या कार्यक्रमास एक लाखाहून जास्त लोक उपस्थित होते.

भगवंत मान म्हणाले की, खटकरकला या गावात मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला एक खास कारण आहे. हे गाव भगत सिंग यांचे गाव आहे. अनेकजण राजवाड्यात आणि महालात शपथ घेतात. मात्र आम्ही स्वातंत्र्य सैनिकांच्या गावात जाऊन शपथ घेतली. ते कायम आमच्या ह्रदयात आहेत. मुख्यमंत्री म्हणून जनतेच्या समस्या दूर करण्याचा माझा प्रयत्न असेल.

सावधान ! उन्हाळ्यात मेथी अधिक प्रमाणात खाताय ?

भगत सिंग जी लढाई लढले, तीच लढाई आम आदमी पक्ष लढत आहे. तसेच चळवळीतून उदयास आलेला पक्ष देशात परिवर्तन घडवत आहे. आम्ही पंजाबमधील शाळा आणि महाविद्यालयांचा दर्जा सुधारु. दिल्लीच्या धर्तीवर पंजाबचा विकास करू, असं मान यांनी शपथग्रहानंतरच्या भाषणात सांगितले.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत “आप” ने 117 सदस्यीय पंजाब विधानसभेत 92 जागा जिंकल्या. मान यांनी धुरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार दलवीर सिंग गोल्डी यांचा 58, 206 मतांनी पराभव केला आहे.

माळशेज घाटात देशातला पहिला पारदर्शक वॉक-वे, पर्यटकांना हवेत चालण्याचं थ्रिल अनुभवता येईल

पिवळी रेषा रेखांकन न करणाऱ्या शाळांवर कारवाई करणार – राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम


Related Articles

- Advertisement -

Latest Articles