Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

आम आदमी पार्टीची स्वराज्य यात्रा : भाजपने भ्रष्टाचार करून पुण्याचे वाटोळे केले, विजय कुंभार

पुणे : पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाने गेल्या पाच वर्षात शहराचे वाटोळे केले. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर वाढला.नागरिकांचे दैनंदिन कोणतेही प्रश्न सुटण्यास भाजपच्या राजवटीचा फायदा झाला नाही.पुणेकर नागरिक येत्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये याचा जाब विचारतील.कसब्यापासून सुरू झालेले भाजप विरोधी वातावरण संपूर्ण पुण्यात पसरेल”, असं मत आम आदमी पार्टीचे पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी व्यक्त केले

---Advertisement---



आज पिंपरी चिंचवड मध्ये स्वराजयात्रा

‘आप’ ची स्वराज्य यात्रा आज(दि.३ जून) रोजी पिंपळेगुरव येथे दाखल होत आहे. पिंपरी चिंचवड शहर कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी सांगितले की,३जुन दुपारी १ वाजता जुनी सांगवी येथे रॅली,३जुन, दुपारी ३.३० वाजता संत तुकारामनगर येथे पदयात्रा,३ जुन संध्याकाळी ४.४५ वाजता जाधववाडी, चिखली येथे रॅली ३जुन संध्याकाळी ६.३० वाजता आकुर्डी येथे जनसभा -होईल, ४ जुन , सकाळी ८ वाजता भक्ती-शक्ती येथे रॅली ४ जुन सकाळी ९ वाजता रावेत येथे पदयात्रा असा भरगच्च जनसंवाद आम्ही आयोजित केला आहे.या यात्रेतून पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या आकांक्षाना परिपूर्ण करण्यासाठी आम्ही आमचा राजकीय अजेंडा जनतेसमोर सादर करणार आहोत ,असे चेतन बेंद्रे म्हणाले.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles