Thursday, March 13, 2025

खरे आतंकवादी कोण ? आप चा सवाल

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

आम आदमी पार्टी ने उत्तराखंड व यूपी येथे जाहीर केलेला काँग्रेस पक्षाचा वचननामा जाळला

पंजाब, UP, गोवा मध्ये वीज बिल स्वस्त व माफी चे आश्वासन देणाऱ्या कॉंग्रेसकडून राज्यात वीज कपात का ?

नागपूर : आज 24 फेब्रुवारी 2022 येथे आम आदमी पार्टी नागपुर च्या वतीने संविधान चौकात विजेच्या प्रश्नाला घेऊन आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे व महाराष्ट्र कोषाध्यक्ष जगजीत सिंग यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने राष्ट्रीय परिषद सदस्य अमरीश सावरकर महाराष्ट्र सहसचिव अशोक मिश्रा, नागपूर संघटनमंत्री शंकर इंगोले, नागपूर सचिव भूषण ढाकुलकर, नागपुर उपाध्यक्ष डॉ शाहिद अली जाफरी, राज्य युवा आघाडी सदस्य कृतल आकरे, उत्तर नागपूर संयोजक रोशन डोंगरे, पश्चिम नागपूर संयोजक आकाश कावळे हे प्रामुख्याने उपस्थित होते. 

आप ने म्हटले आहे की, कोविड-१९ महामारी दरम्यान लॉकडाऊनमुळे राज्यात मार्च ते जून २०२० व २०२१ दरम्यान नागरिकांचा पूर्णपणे रोजगार बंद होतो. यामुळे आजपर्यंत जनता यामधून बाहेर पडलेली नाही. परंतु महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात आली. राज्यातील जनतेजवळ पैसाच नसल्यामुळे विजेची मोठ्याप्रमाणात आलेली वीजबिल भरण्यास नागरिक असमर्थ आहेत. असे असतांना सरकार मात्र बिल न भरू शकलेल्या जनतेच्या थकीत बिलावर मोठ्या प्रमाणात व्याज लावत आहे, तर बिल न भरल्यास वीज खंडित करीत आहे, जे अन्यायकारक व अमानवीय आहे. 

शोषण विरहीत समाज निर्माण करणारा आमूलाग्र ग्रंथ म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा – नरसय्या आडम

जगातील 30 सर्वात सुंदर पर्यटन स्थळांची यादी जाहीर, महाराष्ट्रातील “या” पर्यटन स्थळांचा समावेश

उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकी पूर्वी राज्यातील जनतेला वचन दिले होते की आमचे सरकार आल्यास आम्ही ३०० युनिट घरगुती वापरात ३०% स्वस्त वीज देवू. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या शपथ नाम्या प्रमाणे औद्योगिक विजेचा दर अन्य राज्यांशी स्पर्धात्मक ठेवण्यासाठीचे आश्वासन देण्यात आले होते. यानंतर आपण सुद्धा मागील दिवाळी पूर्वी वीजबिल सवलत देऊन दिवाळी गिफ्ट देण्याची घोषणा केली होती. तर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी जनतेची वीज कापणार नसल्याची घोषणा केली होती. ह्या सर्व घटनांमुळे राज्यातील आर्थिक संकटात सापडलेली जनता आणखीच संभ्रमात पडली असल्याचेही म्हटले आहे.

दिल्ली मध्ये अरविंद केजरीवाल सरकार मागच्या सात वर्षांपासून २०० युनिट वीज मोफत आणि जास्ती वापर करणाऱ्यांनाही कमीत कमी दरात वीजपुरवठा करीत आहे, याचीच कॉपी करीत कॉंग्रेसचे प्रमुख राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी नुकत्याच होत असलेल्या पंजाब, गोवा, उत्तर प्रदेश निवडणुकीत कोरोना काळातील वीजबिल माफ करण्याचे तर नियमित वीज स्वस्त करण्याचे खोटारडे आश्वासन दिले आहे, असा गंभीर टिका करण्यात आली.

ब्रेकिंग : बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

ज्या राज्यात यांचे सरकार आहे, महाराष्ट्रात तर यांच्या कडे उर्जा खाते आहे, तरीही २.५० प्रती युनिट तयार होणारी वीज १२ ते १८ रुपये प्रति युनिट प्रमाणे दर लावून जनतेची लुट करीत आहेत. जर निवडणुका होऊ घातलेल्या राज्यात कॉंग्रेस स्वस्त विजेचे आश्वासन देत आहे तर राज्यात का नाही? असाही सवाल उपस्थित केला आहे.

दुसरीकडे अरविंद केजरीवाल दिल्लीतील जनतेला मोफत व स्वस्त वीज, दर्जेदार शिक्षण, आरोग्याच्या सर्व सोई, महिलांना प्रवास मोफत देत आहेत तर त्यांच्यावर आतंकवादी असल्याचे आरोप, यांचे नेते करीत आहेत. जर जनतेला त्यांचे अधिकार देणे आतंकवाद आहे तर मग जनतेची लुट आणि खोटी आश्वासने देणे याला काय मानायचे, हा प्रश्न निर्माण होत असल्याचेही म्हटले आहे.

12 वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! 5000 पदांसाठी मेगा भरती

आप च्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे :

१. निवडणुका होत असलेल्या राज्यात देण्यात येणाऱ्या आश्वासनाप्रमाने राज्यातील नागरिकांची वीज कनेक्शन कपात बंद करून वीज स्वस्त करावी. 

२. ३०% स्वस्त वीज देण्याच्या जनतेला दिलेल्या वचननाम्याची पूर्तता करा.

३. कोविड दरम्यानचे मार्च ते ऑगस्ट या महिन्याचे २०० युनिट वीजबिल माफी करा.

४. मार्च २०२० ते जून २०२१ या काळातील थकीतवर कोणतेही व्याज आकारू नये. 

५. वीज कंपन्यांचे CAG ऑडीट करा. 

६.  दि. १ एप्रिल २०२० पासून केलेली वीज दर वाढ मागे घ्या.

यावेळी गौतम कावरे, प्रतीक बावनकर, जॉय बांगडकर, हरिश गुरबनी, अभिजीत झा, नंदू पाल, बनसोड काका, दयानंद येट्टा, सुरेंद्र बीडवाईक, आनंद शेंडे, नितीन चौधरी, धीरज खोडके, मुन्ना गुप्ता, सचिन बनकर, मनोज भोयर, शब्बीर भाई, कम्मु अग्रवाल, संतोष शिंदे, संकेत काळबांडे, प्रभात अग्रवाल, रोशनी गौर, संजय बारापात्रे, दीपमाला बारापात्रे आदींसह उपस्थित होते.

रशिया युक्रेन यांच्यात युध्द सुरू, भारतीय शेअर बाजारात सर्वात मोठी घसरण

मंत्री नवाब मलिक यांच्या समर्थनात महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आंदोलन

आरोग्यवार्ता : शरीर संबंधानंतर लघवीला जाणं गरजेचं ? लघवीला न गेल्यास काय होऊ शकतं ? वाचा !

Related Articles

- Advertisement -

Latest Articles