जुन्नर : पाणी कधी सोडणार, असे विचारल्याने महिलेला अश्लील शिवीगाळ करत धमकी दिल्याचा प्रकार जुन्नर तालुक्यातील घाटघर येथे घडला आहे. याप्रकरणी सुरेश मारुती रावते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Junnar News)
मिळालेल्या माहितीनुसार, कुसुम अशोक मुकणे या दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास रस्त्यावरून जात असताना त्यांनी रावते यांच्या सुनेला ‘पाणी कधी सोडणार’ या संदर्भात विचारणा केली. यावरून सुरेश रावते यांनी घरातून बाहेर येत कुसुम मुकणे यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि मारहाण करण्याची धमकी दिली, अशी तक्रार फिर्यादीने दिली आहे.
याप्रकरणी सुरेश रावते यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ११५(२), २५२ आणि २५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस फौजदार गिजरे करीत आहेत.
(Junnar News)
![whatsapp link](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/whatsapp.gif)
![google news gif](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/google-news-GIF.gif)
हे ही वाचा :
CIBIL स्कोअरमुळे मोडलं लग्न ; आर्थिक इतिहास पाहुन वधूपक्षाला धक्का !
अंगणवाडीत विविध पदांसाठी भरती ; मंत्री आदिती तटकरे यांनी दिली महत्वाची माहिती
वाल्मीक कराडच्या बातम्या पाहिल्याने तरूणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण
झोमॅटो कंपनीचे नाव बदलले, आता असेल ‘हे’ नाव
धक्कादायक : ब्लूटूथच्या स्फोटामुळे १७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू