Friday, April 4, 2025
---Advertisement---
---Advertisement---

CCTV :  टोलनाक्यावर रुग्णवाहिकेचा भीषण अपघात, चार ठार तर चार जण जखमी

हा अपघात इतका भीषण होता की, रुग्णवाहिकेचा मागचा दरवाजा धडकेच उघडला गेला आणि त्यातून पेशंटसह चौघे थेट रस्त्यावर आदळले

---Advertisement---

बंगळुरू : रुग्णवाहिका रस्त्यावरून जात असताना तिला सर्वजण रस्ता करून देत असतात, मात्र वेगामुळे अनेकदा अपघातांची शक्यता निर्माण होते. अशात कर्नाटकमधील बयंदूरजवळील टोलनाक्यावर एका रुग्णवाहिकेच्या भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे.

होन्नावरा येथे अपघातग्रस्त रुग्णवाहिका रुग्णाला घेऊन जात असताना रुग्णवाहिकेचा टोलनाक्यावर भीषण झाला आहे. रुग्णवाहिका टोलनाक्यावर आली असताना रस्त्यात गाय बसलेली होती. या सोबतच रस्त्यात बॅरिकेडस लावण्यात आलेला होता. हा बॅरिकेडस दूर करण्यासाठी टोलनाक्यावरील कर्मचारी धावला त्याचवेळी वेगाने येणारी रुग्णवाहिका टोलनाक्यावर येऊन जोरात धडकली. या भीषण अपघातात टोलनाक्यावरीकर्मचाऱ्यांसह चार जण ठार तर चार जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बुधवार 20 जुलै रोजी हा अपघात झाला.

---Advertisement---

हा अपघात इतका भीषण होता की, रुग्णवाहिकेचा मागचा दरवाजा धडकेच उघडला गेला आणि त्यातून पेशंटसह चौघे थेट रस्त्यावर आदळले. यात त्यांना जबर मार बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या रुग्णवाहिकेत एकूण आठ जण होते. या अपघाताचे दोन कॅमेरा एन्गल आता समोर आले आहेत. यामध्ये टोल गेटसह रुग्णवाहिकेचाही चक्काचूर झाला आहे.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles