Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे एसएफआय वतीने प्रकल्प अधिकारी यांना निवेदन

घोडेगाव : आदिवासी आश्रमशाळा, वसतिगृहे यांच्या समस्या सोडविण्यासाठी व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शून्य शुल्क प्रवेश योजनेची अंमलबजावणी करावी यासाठी एसएफआय ने प्रकल्प अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. 

---Advertisement---

आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहे, प्रवेश प्रक्रिया, सेन्ट्रल किचन बंद करण्यात यावे इत्यादी मागण्यांना घेऊन स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) पुणे जिल्हा समितीच्या वतीने दि.१२, १३ सप्टेंबर, २०२३ रोजी घोडेगाव येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले होते. यानंतर काही समस्यांवर तोडगा निघाला व कार्यालयाकडून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन देखील दिले गेले होते. पुढे काही दिवस याबाबत सकारात्मक कार्यवाही देखील झाली मात्र पुनः त्याच समस्या विद्यार्थ्यांना ३ महिन्यानंतर भेडसावत आहेत. या समस्या सोडविण्यासाठी एसएफआय आंबेगाव तालुका समितीच्या वतीने सहाय्यक प्रकल्प अधिकारी पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. 

एसएफआय प्रमुख मागण्या  पुढीलप्रमाणे : 

---Advertisement---

1. आदिवासी मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृह, मंचर येथील विद्यार्थ्यांच्या मुलभूत समस्या यामध्ये कचरा व्यस्थापन,पाण्याची टाक्यांची स्वच्छता, संगणक कक्ष, अभ्यासिका कक्ष इ. व इतर समस्या त्वरित सोडविण्यात याव्यात.

2. शैक्षणिक वर्ष २०२२ -२०२३ व २०२३ – २४ या शैक्षणिक वर्षाची थकीत स्वयंम ची डीबीटी, वसतिगृह डीबीटी, भारत सरकार शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांना त्वरित वितरीत करण्यात यावी. 

3. शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांना वेबसाईट चालू नाही आणि महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी तगादा लावला जात आहे. तरी शिष्यवृत्ती फॉर्म ची वेबसाईट चालू करण्यात यावी. 

4. ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना तात्काळ स्वयंम योजनेचा लाभ देण्यात यावा. व चालू शैक्षणिक वर्षात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना स्वयंम डीबीटी अदा करण्यात यावी. 

5. आपल्या कार्यालयाचे महाविद्यालयांनी आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश देते वेळी कोणत्याच प्रकारचे शैक्षणिक शुल्क आकारू नये असे परिपत्रक असताना, महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून भरमसाठ फी घेत आहेत. तरी आपण याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर महाविद्यालयांना निर्देश देण्यात यावे.

यावेळी संघटनेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष दिपक वाळकोळी, पुणे जिल्हा सहसचिव व आंबेगाव तालुका सचिव समीर गारे, तालुका कोष्याध्यक्ष रोहिदास फलके, सहसचिव योगेश हिले उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles