Wednesday, February 5, 2025

PCMC : ओम गणेश सोसायटी काकडे टाऊन शिप मध्ये पाणी विरहित होळी

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दि. २६ – शहरातील (PCMC) पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर होळी व धुळवड हे उत्सव पाण्याचा अपव्यय टाळून साजरे करण्याची गरज आहे. रासायनिक रंग टाळून टिळा लावून रंगोत्सव साजरा केल्यास, पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे ही आता सवय झाली पाहिजे, पाणीबचतीसह पर्यावरणाच्या रक्षणास हातभार लागेल.

हा व्यापक उद्देश ठेवून ओम गणेश सोसायटी काकडे टाऊन शिप, चिंचवड येथील सर्व सदस्यांनी पाणी विरहित एकमेकांना नैसर्गिक रंगाचे सुगंधी टिळे लावले, पाणी वाचवा, केमिकल विरहित रंग लावत, प्रेम स्नेह व आपली संस्कृती जपत धुलीवंदन धुमधडाक्यात साजरी केले. PCMC NEWS

धुलिवंदनची पारंपारीक गाणी लावून त्यावर महिला,पुरुष,लहान मुले यांनी ठेका धरीत नृत्य केले. होळी, धुळीवड साजरी केली. सदस्यांनी घराच्या गॅलरीतून रंग पाणी
वापरले नाही, पाण्याची बचत झाली, तसेच सोसायटीच्या परिसरात रंगाची नासाडी झाली नाही. PCMC NEWS

सोसायटी अध्यक्ष – मधुकर बच्चे, खजिनदार – अजित नाईक,सेक्रेटरी – राजू कोरे यांच्यासह अनेक पुरुष, महिला सभासदांनी या अभिनव  रंगोत्सवाच्या नियोजनात भाग घेतला.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles