World Kidney Day 2024 किडनी आपल्या शरीरातील सर्वात महत्वाच्या अवयवापैकी एक मानला जातो. 14 मार्च हा दिवस किडनी आरोग्य दिन म्हणून पाळला जातो. किडनीचे आरोग्य राखणे आपली जबाबदारी आहे.किडनी आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करते.World Kidney Day 2024 तसेच आपल्या तंदुरुस्त आणि आरोग्यदायी बनविण्यासाठी सतत कार्यरत असते. शरीरातील एक प्रकारची ही गाळणी असते.World Kidney Day 2024 त्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताभिसरण आणि ब्लड प्रेशर सुरळीत राखण्याची जबाबदारी आपल्या दोन्ही किडन्यांवर असते. जागतिक किडनी दिनानिमित्त आपण किडनीचे आरोग्य बिघडविणाऱ्या घटकांची माहीती घेऊयात…World Kidney Day 2024
तुम्ही नेहमी ऐकले असेल कि किडनीचे ट्रान्सप्लांट करुन एखाद्या रुग्णाला जगविता येते. माणसाला दोन किडनी दिलेल्या असल्या तरी त्यांचे आरोग्य राखणे खूपच महत्वाचे आहे. आपल्या काही वाईट सवयी किडनीला डॅमेज करु शकतात. त्यामुळे किडनीचे आरोग्य सांभाळण्यासाठी काही पथ्य पाळणे गरजेचे असते. आपल्या अनेक वाईट सवयींचा किडनीवर वाईट परिणाम होतो. तर पाहुयात किडनीचे आरोग्य कसे सांभाळावे….
खूप जादा मिठाचा आहारात वापर
तुम्ही जर अधिक मीठ असलेले पदार्थ खात असाल तर ही गोष्ट तुमच्या किडनीसाठी धोकादायक आहे. यामुळे तुमची किडनी आजारी पडू शकते. तिच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. मीठामुळे ब्लड प्रेशर देखील वाढते. त्यामुळे किडनी खराब होऊ शकते.
कमी पाणी पिण्याची सवय
तुम्हाला जर कमी पाणी प्यायची सवय असेल तर तुमच्या किडनीच्या आरोग्यासाठी ही चांगली बातमी नाही. जर तुमच्या शरीरात पाण्याचे योग्य प्रमाण नसेल तर किडनीचे आजार होऊ शकतात. कमी पाणी प्यायल्यामुळे डीहायड्रेशन होऊ शकते. ज्यामुळे किडनीतुन टॉक्सिन्सला बाहेर काढण्याची क्षमता घटते. आणि किडनीच्या कार्यप्रणालीवर परिणाम होऊ शकतो.
पेन किलरचा वापर
इबुप्रोफेन किंवा अॅस्पिरीन सारख्या पेन किलर औषधांचा नियमित आणि अतिरिक्त वापर किडनीचा नुकसान पोहचवतो. जर जुन्या आजारांसाठी पेन किलर म्हणून तुम्ही सतत पेन किलर गोळ्या खात असाल तर किडनी निकामी होण्यास सुरुवात होते.
हायप्रोटीन डाएट
तुम्ही आरोग्य सुधारण्यासाठी हाय प्रोटीनची अतिरिक्त मात्रा घेत असाल तरी तुमची किडनी धोक्यात सापडू शकते. प्रोटीनची आपल्या शरीराला गरज असते. परंतू प्रोटीन अतिरिक्त मारा तुमची किडनी दबाव आणू शकतो. तिचे कार्य देखील बिघडवू शकतो.
स्मोकिंग
धूम्रपानामुळे केवळ कार्डीओ वॅस्कुलर सिस्टीमचे नुकसान होत नाही तर किडनीचा ब्लड फ्लो कमी करुन किडनीचा कॅन्सर वाढविण्यास देखील मदत सिगारेट्स पिणे आमंत्रण देऊ शकते.