8 मार्च ला लायन्स क्लब पिंपळे सौदागर ऍक्टिव्ह व वुमन हेल्थ केअर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दिव्य रॅलीचे आयोजन
पिंपरी चिंचवड/क्रांतीकुमार कडुलकर: दि.०८ – आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पूर्णानगर, (चिंचवड PCMC) येथे लायन्स क्लब ऑफ पिंपळे सौदागर ऍक्टिव्ह व वूमेन हेल्थ केअर कम्युनिटीच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त ‘टू व्हीलर हेल्थ’ रॅलीला चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी हिरवा झेंडा दाखवला. PCMC
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/IMG-20240309-WA02091-1024x768.jpg)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचे उद्घाटन केले
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/IMG-20240309-WA02103-1024x768.jpg)
यानंतर उपस्थित महिला, लायन्स सदस्य, महिला पोलिस दामिनी पथक, नागरिक, विद्यार्थी मुले, मुली यांना महिला ‘दिन आणि सुरक्षित समाज ‘याविषयी मार्ग दर्शन करताना काटकर म्हणाले की, बालगुन्हेगार हा गरीब घरचा,अशिक्षित- भागातून आलाआहे,असा समज चुकीचा आहे. मोबाइल चोरणे, ते कमी किमतीत विकणे, पेट्रोल चोरून ते चोरीच्या गाडीत घालून फिरवणे, घरफोडी, सायबर गुन्हे यात १६ ते १८ वयोगटातील सुशिक्षित व उच्चभ्रू घरातील शहरी मुलांचे प्रमाण खूप जास्त आहे.
चित्रपट, बदलणारी मूल्यव्यवस्था व चंगळवादी संस्कृतीमुळे मुले बिघडतात, असे म्हणण्याऐवजी पालकांचा अनाठायी विश्वास, दुर्लक्ष, अतिलाड, पाल्याच्या दुर्वर्तनाचे समर्थन हीच बालगुन्हेगारीची मूलभूत कारणे आहेत. लायन्स क्लब सारख्या संस्थांनी अल्पवयीन मुलामुलींसाठी नावीन्यपूर्ण समुपदेशन किंवा इनोव्हेंशन सेंटर शहरात सुरू करावीत.
आमच्या दामिनी पथकातील महिला अधिकारी लायन्स क्लबला सहकार्य करतील
असे चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी पूर्णा नगर चिंचवड येथे सांगीतले.
लायन्स क्लब ऑफ पिंपळे सौदागर ॲक्टिव्हच्या अध्यक्षा प्रीती बोंडे यांनी महिला दिनानिमित्त यांनी ‘टू व्हीलर रॅली फॉर हेल्थ’ आणि महिलांचा विविध गुण दर्शन कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/IMG-20240309-WA02381-1-1024x576.jpg)
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/IMG-20240309-WA02371-1-1024x576.jpg)
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रीती बोंडे म्हणाल्या की, श्रीमंत व गरीब घरातील पालक दैनदीन जीवनात व्यस्त आहेत.कुटुंबवत्सल महिला नोकरी, व्यवसायात ताण तणाव सहन करत आहेत, त्यांच्यासाठी लायन्स क्लब विविध कार्यक्रम राबवत आहे. आज या ठिकाणी मावळ तालुक्यातील अति दुर्गम भागातील मुलींना शाळेत जाण्यासाठी आम्ही सायकल दिल्या आहेत.
शालेय साहित्य, संगणक, किराणा तेथील सेवाभावी संस्थांच्या मदतीने मागणीनुसार आम्ही मागील दोन वर्षात दिल्या आहेत. पोलीस खाते, सरकार व लायन्स क्लबच्या संयुक्त सहकार्यातून बाल संस्कार केंद्रे शहरातील गरीब वस्त्यात सुरू करण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू.
पोलीस नागरिक हे एकमेकांचे मित्र आहेत, पोलीस हे गणवेशातील नागरिक आहेत आणि हे गणवेशात नसलेले पोलीस आहेत. हे घटक एकमेकांना सहकार्य करतील त्यातून ही समुपदेशन व स्किल डेव्हलमेंट सेंटर लायन्स क्लब शहरात सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेऊ. आता स्थलांतरित लोंढे शहरात आहेत, कॉलेजमधील वाढते नवयुवक युवतींचे ग्रुप यांनाही त्याद्वारे संस्कारित करता येईल असे प्रीती बोंडे यांनी आश्वासन दिले.
यावेळी लायन्स क्लब सौदागरच्या सभासद लायन गुलशन नायकुडे यांनी आदिवासी भागातील मुलींना दोन सायकल दान केल्या.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/IMG-20240309-WA02711.jpg)
विविध संस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण
Movs fit dance studio team ने झुंबा डान्स केला, महिला, विद्यार्थी टीम, हिरकणी डान्स ग्रुप सेक्टर 16 राजे शिवाजीनगरच्या शीतल खरपस, अर्चना वायदंडे, स्नेहल राणे, राणी रंगदळ, वैशाली खोडदे, मयुरी खेडेकर, नीतू विश्वकर्मा, जान्हवी लोंढे यांनी प्रेरणादायी लोकगीतांचे उत्कृष्ट सादरीकरण केले.
उल्लेखनीय कार्य केलेल्या महिला,विद्यार्थी, मुले,मुली, रॅलीतील सहभागी सर्वांना लायन्स सदस्य ई ना भेटवस्तू,सन्मान चिन्हे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/IMG-20240309-WA02111-1024x768.jpg)
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/IMG-20240309-WA02531-1024x518.jpg)
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री ज्ञानेश्वर काटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिखली पोलीस स्टेशन,पोलीस इन्स्पेक्टर चिखली पोलीस स्टेशन डी एस मुंडकर, मिसेस. महाराष्ट्र ब्युटी क्वीन नीलिमा डायस 2023, आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तरडे, पल्लवी काटकर यांचा सत्कार पदाधिकारी प्रेसिडेंट लायन प्रीती बोंडे, सेक्रेटरी लायन बालाजी जगताप ट्रेझरर धनंजय माने, लायन MJF सुनील जाधव, वुमन हेल्थकेअर डिस्टिक चेअर पर्सन लायन शैलेजा सांगळे यांनी केला.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन लायन शोभा कदम यांनी तसेच संयोजन लायन दीपक सोनार, लायन जयंत बोंडे, लायन जितेंद्र हिंगणे, लायन अंजुम सय्यद, लायन दीपा जाधव तसेच सर्व लाईन्स मेंबर यांनी केले.
![whatsapp link](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/whatsapp.gif)
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/google-news-GIF.gif)
हे ही वाचा :
मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त जिओ मोफत रिचार्ज देत आहे का ? वाचा काय आहे सत्य !
काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर, राहुल गांधी लढणार या मतदार संघातून
मोठी बातमी : मंत्रालयात भीषण आग, अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक
समृद्धी पाठोपाठ आता नागपूर-पुण्याचे अंतरही सहा तासात पूर्ण होणार
पुण्यात एका अफवेने मध्यरात्री तणावाचे वातावरण, पोलिसांचा चोख बंदोबस्त
ब्रेकिंग : सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांची घोषणा