Wednesday, February 12, 2025

PCMC : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर सामाजिक न्याय महिला विभागाच्या वतीने महिला दिन साजरा

कर्तृत्ववान महिलांचा गौरव करून महिला दिन साजरा करण्यात आला.

पिंपरी चिंचवड/क्रांतीकुमार कडुलकर:दि.०८ -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) सामाजिक न्याय महिला विभागाच्या वतीने मध्यवर्ती पक्ष कार्यालय,खराळवाडी, पिंपरी येथे “जागतिक महिला दिन” निमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे व महिला अध्यक्षा प्रा.कविता आल्हाट यांच्या मार्गदर्शनात सामाजिक न्याय महिला विभागाच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा गौरव करून महिला दिन साजरा करण्यात आला.

कर्तृत्ववान महिलांचा गौरव

१) पुनम अनंत अंभिरे यांनी अत्यंत गरिब परिस्थ‍ितीतून मेहनतीने मुलीचे श‍िक्षण पूर्ण करून तिला परभणी जिल्हा आरोग्य अधिकारी पदापर्यंत पोहचवून एक आदर्श माता म्हणून काम केले आहे

२) गवळण रोहिदास कांबळे यांनी आपल्या मुलाचे अत्यंत गरिब व हालाकीच्या परिस्थ‍ितीतून वकीलीचे शिक्षण पूर्ण करून त्यास सक्षम केले, त्याबद्दल एक आदर्श माता म्हणून काम केले आहे.

३) ज्योती डोळस या सांस्कृतिक क्षेत्रात करित असलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल या महिलांचा सन्‍मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी ओबीसी विभागाचे अध्यक्ष विजय लोखंडे,महिला कार्याध्यक्ष कविता खराडे,महिला मुख्य संघटक पुष्पा शेळके,अर्बन सेल अध्यक्षा मनीषा गटकळ,बचत गट महासंघ अध्यक्ष ज्योती गोफणे, महिला उपाध्यक्ष आशा शिंदे या सर्व मान्यवरांनी महिलांसाठी सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रामध्ये असणाऱ्या विविध संधी व त्या संधीचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करून माहिती दिली.

सामाजिक न्याय महिला विभागाच्या वतीने सर्व महिला पदाधिकारी यांनी आज महिला दिनाचे औचित्य साधून मेट्रो सफारीचा आनंद देखील घेतला.

सदर कार्यक्रमास शहर कार्याध्यक्ष फजल शेख, साफसफाई कामगार अध्यक्षा सुवर्णा निकम, मेघा पळशीकर, वंदना कांबळे, आशा मराठे, वर्षा शेडगे, रतन जगताप,भारती काळभोर,रजनी गोसावी,सुवर्णा निकम,अनिता गायकवाड यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles