लायन्स क्लब ऑफ पिंपळे सौदागर ऍक्टिव्ह
व वूमेन हेल्थ केअर कम्युनिटी चा संयुक्त उपक्रम
पिंपरी चिंचवड/ क्रांतीकुमार कडुलकर:आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांनी आरोग्य आणि निरोगीपणाला प्राधान्य देण्याची गरज आहे. महिलांवर असलेल्या विविध जबाबदाऱ्यांमुळे त्यांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक व्याधीही होण्यास सुरुवात होते.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/IMG-20240307-WA0095.jpg)
महिलांच्या हक्कांचे रक्षण आणि स्त्री-पुरुष समानता या दृष्टीने जागतिक महिला दिनाला महत्त्व आहे.त्या निमित्ताने प्रेरणादायी उत्साह कार्यक्रम खास महिलांसाठी आयोजित करण्यात आला आहे,शहरातील सर्व महिलांनी सामील व्हावे,असे आवाहन टू व्हीलर रॅलीच्या आयोजिका प्रीती बोंडे यांनी केले आहे.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/IMG-20240307-WA0313-1024x802.jpg)
पिंपरी चिंचवड शहर तसेच पूर्णानगर परिसरातील महिलांसाठी शुक्रवार दि. ८ मार्च २०२४ रोजी सकाळी ठीक ७ वा. शनि ग्राउंड,पूर्णानगर चिंचवड येथे टू व्हीलर बाईक रॅली साठी उपस्थित राहावे,असे आवाहन लायन्स क्लब ऑफ पिंपळे सौदागर ऍक्टिव्ह च्या अध्यक्षा प्रीती बोंडे यांनी केले आहे.
रॅली संदर्भात अधिक माहिती साठी या नंबरवर आपण संपर्क करू शकता
9764473833