Saturday, March 15, 2025

फायनान्स कंपन्यांची कर्जवसुली थांबवा; सर्व कर्जे माफ करण्याची मागणी.

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

प्रतिनिधी : कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रामीण भागातील फायनान्स कंपन्यांची कर्जवसुली त्वरीत थांबवा आणि सर्व कर्जे माफ करण्याची मागणी अखिल भारतीय किसान सभेच्या कवठेमहांकाळ तालुक्याच्या वतीने तहसिलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

              सध्या जगभर कोरोना विषाणूने थैमान घातले असून देशभरातील आर्थिक परिस्तिथी कोलमडली आहे. तालुक्यात विविध फायनान्स कॅम्पण्याने ग्रामीण भागात जाळे विणले आहे , फायनान्स कॅम्पानिकडून सदराची कर्जे ग्रामीण भागातील महिलांना दिले जातात, या कर्जदार महिला ग्रामीण भागात मोल मजुरी व इत्तर कामे करून आपला उदार निर्वाह कारीत असतात.  कोरोनाचे संकट आल्याने व लॉकडॉउन मुळे हाताला कसलेही काम नाही. त्यामुळे सध्या कुटुंब चालवणे सुद्धा मुश्कील झाले आहे. फायनान्स कंपन्या कर्जाच्या हप्त्यासाठी तगादा लावला आहे, सदराची संपूर्ण कर्जे माफ करावीत असे निवेदनात म्हटले आहे.

          या पुढे आमच्या दारात येऊन वसुलीचा तगादा लावल्यास फायनान्स कंपन्यांच्याविरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा या निवेदना दवारे देण्यात आला आहे.

           यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा सरचिटणीस दिगांबर कांबळे, विशाल काटे, गवस शिरोळकर , मंगल कांबळे, भरत कांबळे, आतुरोज पवार, माल काबरे, ललिता सोनवणे, नंदा काटे आदी उपस्थित होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles