Saturday, March 15, 2025

६५ लाख निवृत्तीधारकांची पेन्शन वाढणार, केंद्र सरकार चा ऐतिहासिक निर्णय ची बातमी दिशाभूल करणारी – पेन्शनर्स फेडरेशन

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

प्रतिनिधी: इपीएस ९५ अंतर्गत पेन्शनर्स ६५ लाख सेवानिवृत्त ना पेंशन वाढणार अशी बातमी फिरत आहे. ही बातमी दिशाभूल करणारी असल्याचे आयटकचे राज्य सचिव राजू देसले यांनी म्हटले आहे.

            २००८ पूर्वी सेवानिवृत्त धारकाने जर एकरकमी कम्युटेशन रक्कम घेतली असेल, तर दरमहा पेन्शन मधून वसूल करण्यात येत होती( उदा. पेन्शन विक्री). या संदर्भात १९९५ ते २००८ पर्यन्त १/३ पेन्शन विक्री करून १०० हप्त्यात वसूल करण्याचा नियम होतो. मात्र हो १०० हप्त्याचा नियम काडून टाकण्यात आला व पेन्शन विक्री ही बंद केली होती. पेन्शनर्स संघटना मात्र या निर्णय विरोधात सातत्याने देशभर लढत होत्या व १०० हप्त्यापेक्षा जास्त वसुली सुरू होती ती बंद करण्याची मागणी होत्या. इपीओच्या CBT मेंबर ची मीटिंग आगस्ट २०१९ रोजी हैदराबाद येथे झाली. त्यात १०० हप्त्याची मुदत १८० महिने करण्याचा निर्णय घेतला होता. या चे परिपत्रक २२ फेब्रुवारी २०२० रोजी काढण्यात आले व ज्या सेवानिवृत्त ने पेंशन विकली आहे. त्याचे १८० हप्ते पूर्ण झाले वर त्याची कपात बंद करून तितकी रक्कम दरमहा पेन्शन मध्ये वाढ होणार आहे व अधिक काळ झाला असल्यास फरक रक्कम मिळणार आहे.  सरकारने केलेली चूक दुरुस्त केली आहे. 

            देशभरात फक्त ६ लाख पेन्शनर्स ला दिलासा मिळणार आहे. त्यात पेन्शन वाढीचा काहीही संबंध नाही, उलट केंद्र सरकारने १०० ऐवजी १८० हप्ते वसूल करून अल्प पेन्शन घेणाऱ्या सेवानिवृत्त धारकाचे आर्थिक शोषण ८० हप्ते मधून केले आहे. देशातील ७० लाख पेन्शनर्स गेली १२ वर्ष पासून इपीएस ९५ पेन्शन वाढीसाठी आंदोलन करत आहेत . केंद्र सरकारने २०१२ मध्ये तत्कालीन राज्य सभेचे खासदार व आजचे महाराष्ट्र राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. त्या समितीने किमान पेन्शन 3 हजार रुपये महागाई भत्ता सह द्यावी व आरोग्य सुविधा उपलब्ध मोफत करून घ्या म्हणून शिफारस केली होती.  २०१३ मध्ये भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी आमचे सरकार सत्तेत आल्यावर दरमहा 3 हजार रुपये पेन्शन महागाई भत्ता सह लागू करू, असे आश्वासन देऊन मते मिळवली. मात्र आज पर्यंत १ रु ही पेन्शन वाढ केली नाही. म्हणून आम्ही देशाचे संरक्षण करणारे सैनिकाची पेंशन वाढली. मात्र हा हा देश घडविणारे कामगार ची पेन्शनर्स ला अच्छे दिन कधी येणार? केले असल्याचे देसले म्हणाले. 

             देशात २५ लाख कामगारांना १ हजार रुपये पेन्शन मिळते तर  १ ते २ हजार पर्यन्त पेंशन मिळणारे ५० सेवानिवृत्त आहेत. शासनाने अडचणीत असणाऱ्या इपीएस पेन्शनर्सची खोट्या बातम्या पेरणे थट्टा थांबवावी व  जगण्यासाठी किमान पेन्शन ९ हजार रुपये महागाई भत्ता सह लागू करा, अशी मागणी नाशिक जिल्हा इपीएस ९५ पेन्शनर्स फेडरेशन वतीने संस्थापक अध्यक्ष राजू देसले यांनी केले आहे

Related Articles

- Advertisement -

Latest Articles