Wednesday, February 12, 2025

PCMC : राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सुरक्षा सप्ताह जनजागृती अभियान

मानवी हक्क संरक्षण आणि जागृती व गुणवंत कामगार कल्याण मंडळाचा उपक्रम

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : मानवी हक्क संरक्षण आणि जागृती व गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या वतीने राष्ट्रीय सुरक्षा सुरक्षा सप्ताह निमित्त पटनाट्य,रॅली,भितीपत्रके वाटून जनजागृती करण्यात आली.
पिंपळे गुरव,नवी सांगवी येथील कृष्णा चौक,साई चौक,या ठिकाणी 52 व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह दिनानिमित्त रॅली काढून पटनाट्यद्वारे,स्लोगन द्वारे,स्पीकर द्वारे जनजागृती करण्यात आली.

यावेळी आण्णा जोगदंड म्हणाले की,व्यवसाय, नोकरीच्या निमित्ताने बाहेर जातो.आणि
कुटुंबीय आपली सुखरूप येण्याची वाट बघत आहेत.याचा विचार करून वाहन चालकांनी
वाहतूक सुरक्षा नियमांचे पालन करावे.

विविध सुरक्षा नियमाकडे
दुर्लक्ष केल्यामुळे 99% अपघात एकाग्रता नसल्याने तर 60% अपघात अतिवेगाने आणि मानवी चुकामुळे होत असतात,18%अपघात पादचारी संबंधित आहेत तर देशात दर 4.61लाख अपघात होतात,राज्याचा देशात तिसरा क्रमांक लागतो जगाच्या लोकसंख्येच्या 17%अपघात भारतात होतात. 29 प्रकारचे अपघात अति विश्वासाने होतात.असा केंद्रीय रस्ते वाहतूक व सुरक्षा विभागाचा अहवाल आहे.

याची माहिती देताना आण्णा जोगदंड म्हणाले की,
आवरा वेगाला,सावरा जिवाला.सेफ्टी होल्ड लाईफ इज गोल्ड,मत करो मस्ती,जिंदगी नही सस्ती.जो चुकला नियमाला,तो मुकला जीवनाला.गाडी चालवताना मारू नका गप्पा, नाहीतर जीवनाचा होईल शेवटचा टप्पा— त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहात स्लोगन द्वारे पथ नाटय सादरीकरण करून जनजागृती करून सुरक्षेतेची शपथ घेण्यात आली आहे.


यावेळी संस्थाध्यक्ष विकास कुचेकर,शहराध्यक्ष आण्णा जोगदंड,महिला शहराध्यक्षा मीना करंजावणे,पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड,,उपाध्यक्ष विकास शहाणे,कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी,सचिव गजानन धाराशिवकर,मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरूण पवार,निलेश हंचाटे सह गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे शहराध्यक्ष मुलानी महमदशरीफ,संचालक भरत शिदे,रवींद्र चव्हाण,काळुराम लांडगे सह,वाहतूक विभाग सागवीचे पी.एस.आय.संजय कामटे,अनंत यादव,गणेश वाडेकर,सुरेश सकट,बाळासाहेब साळुंके,प्रदिप बोरसे,प्रकाश वीर,रवींद्र तळपदे,दत्तात्रय अवसरकर,शंकर नानेकर,विकास कोरे.पोलीस मित्र राजेंद्र कुवर,निखिल कुमावत,विठ्ठल पाटील, संतोष ढमनगे, नितीन ढमनगे,सा.मा.किसन फसके,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles