Friday, May 9, 2025
---Advertisement---
---Advertisement---

राजर्षी शाहू महाराजांचा अपमान करणाऱ्या भाजप युवा मोर्च्याचा जाहीर निषेध – एसएफआय

---Advertisement---

कोल्हापूर : शाहू समाधीस्थळी गोमूत्र शिंपडणाऱ्या भाजपा युवा मोर्च्याचा स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाने जाहीर निषेध पत्रकाद्वारे केला आहे. तसेच सबंधित लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

२६ जून रोजी राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी झाली. यावेळी नगरसेवक आदिल फरास यांच्याकडून नजर चूकीने पादत्राणे काढण्याचे विसरले. आदिल फरास यांनी चूक मान्य करत काल शाहू समाधीस्थळी आत्मक्लेश आंदोलन केले. 

---Advertisement---

तरीही भाजप युवा मोर्चे अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी फरास यांनी ज्या ठिकाणी आत्मक्लेश आंदोलन केले, त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडले, हा शाहू महाराजांचा अपमान आहे. ज्यांनी शाहू महाराजांना वेदोक्ताचा अधिकार नाकारला त्याच विचारसरणीच्या लोकांनी पुन्हा महाराजांचा अपमान केला आहे. शिवाय विनाकारण धार्मिक तणाव निर्माण करायचा प्रयत्न करत शाहूविचाराशी प्रतारणा केली आहे. 

शाहू महाराजांनी शिकवलेली धार्मिक सहिष्णुता जोपासणाऱ्या करवीर नगरीची या मनुवादी लोकांनी जाहीर माफी मागावी, तसेच संबंधित लोकांवर कारवाई करावी अशी मागणी एसएफआयचे राज्य सचिवमंडळ सदस्य नवनाथ मोरे, जिल्हा अध्यक्ष सर्वेश सवाखंडे, जिल्हा सचिव रत्नदिप सरोदे, जिल्हा सहसचिव तुषार सोनुले यांंनी केली आहे.

     

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles