Thursday, February 13, 2025

सरन्यायाधीशांच्या संतापाचा पारा चढला, भाजपला मोठा झटका, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले ?

चंदीगड : महापौर निवडणुकीबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली 3 न्यायाधीशांनी या खटल्याची सुनावणी केली.या सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी पीठासीन कार्यालयाचा व्हिडीओही पाहिला आहे. त्यामध्येमध्ये ते मतं रद्द करत असल्याचे दिसून येत आहे. त्यावर बोलताना त्यांनी ही लोकशाहीची थट्टा असल्याचा ठपका सरन्यायाधीशांनी ठेवला आहे.

जो प्रकार घडला आहे, ते पाहून आम्ही हादरलो असल्याचेह त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आम्ही ही लोकशाहीची अशा प्रकारे हत्या होऊ देऊ शकत नाही, असंही सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले. यावेळी सरन्यायाधीशांनी निवडणुकीचा संपूर्ण व्हिडिओही सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.चंदीगड महापौर निवडणुकीला आव्हान देणाऱ्या आप आणि काँग्रेसचे उमेदवार कुलदीप कुमार यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावण्यात आली आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले की, ‘आम्ही तुम्हाला सांगतो की, ‘पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारकडे ही सर्व कागदपत्रे आणि सर्व व्हिडिओ पुराव्यांसह संपूर्ण रेकॉर्ड संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.’The wrath of the Chief Justice has risen, a big blow to the BJP, what did the Supreme Court say?


ही लोकशाहीची थट्टा

या प्रकरणावर सरन्यायाधीश यांनी सांगितले की, ‘पीठासीन अधिकाऱ्यांनी मतपत्रिका खराब केल्याचे यामध्ये स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईही झाली पाहिजे.’ पीठासीन अधिकाऱ्याच्या कॅमेऱ्यामध्ये पाहिल्यावर त्यावर त्यांनी सवाल केला आहे की, ते कॅमेऱ्यामध्ये का बघत आहात? यावेळी त्यांनी वकिलांना उद्देशूनही म्हटले आहे की, ‘ही लोकशाहीची थट्टा असून ही लोकशाहीची हत्या असल्याचा गंभीर टीप्पणीही त्यांनी केली आहे.’ तसेच हे रिटर्निंग ऑफिसचे वर्तन आहे का? असा सवाल करून रिटर्निंग ऑफिसरला सांगा की, सरन्यायाधीश हे त्यांच्यावर लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.”

Related Articles

- Advertisement -

Latest Articles