Sunday, March 16, 2025

नागरिकांनो सावधान : जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागात होतोय कोरोनाचा शिरकाव

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now


जुन्नर
 : तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात कोरोनाचा शिरकाव होताना दिसत आहे. आजपर्यंत एकही रुग्ण नसणाऱ्या या भागात आता कोरोनाने शिरकाव केला आहे.

पश्चिम आदिवासी भागातील आफटाळे, उंचखडक, केवाडी या भागात सुध्दा कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

कोरोनाचे थैमान कमी होण्याची चिन्हे दिसत नाही. राज्यात सातत्याने अनलॉक जाहीर होत असताना अनेक बाबींना सवलती दिल्या जात असल्या तरी नागरिकांची बेपर्वाई समोर येत आहे. मास्क न घालणे, सॉनिटाईझरचा वापर न करणे, शारीरिक अंतर न पाळणे, काळजी न घेणे, यामुळे ग्रामीण भागातील विळखा वाढताना दिसत आहे.

डोंगर दऱ्यांच्या या भागात जरी आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असला तरी सुखी समाधानी जीवन जगणाऱ्या माणसे भितीच्या सावटाखाली आहे. परंतु कोरोनावर मात करण्यासाठी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.

प्रशासनाने ग्रामीण भागातील शिरकाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. नागरिकांनी सुध्दा सतर्क राहू स्वतःची काळजी घेतली पाहिजे. अन्यथा हा होणार शिरकाव मोठे आवहान ठरेल.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles