Wednesday, February 12, 2025

उत्तर काशी दुर्घटना : बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी मोठे ड्रिल मशीन आणले

उत्तरकाशी : उत्तराखंडमध्ये 100 तासांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र बोगद्यात अडकलेल्या 40 लोकांचा जीव अद्यापही धोक्यात आहे. त्यांना बोगद्यातून बाहेर काढण्यात यश आलेले नाही. दरम्यान, आत अडकलेल्या कामगारांशी झालेल्या संभाषणाचा एक ऑडिओ समोर आला आहे. कामगार आतून सुटकेसाठी हाका मारत आहेत.



उत्तरकाशीतील सिलक्यारा बोगद्याचा काही भाग कोसळल्याने गेले चार दिवस सतत प्रयत्न सुरू आहेत. बोगद्याच्या आत मध्ये माती ढासळून मजूर अडकले आहेत. 12 मीटर आत मोठे पाईप टाकून बचावाचे प्रयत्न पुन्हा सुरू करण्यात आले आहेत.उच्च क्षमतेची ड्रिलिंग मशीन नवी दिल्लीहून हवाई दलाच्या मालवाहू विमानाने आणून घटनास्थळी जोरदार काम सुरू आहे.आवश्यक व्यवस्था करण्यात आल्या असून ही उपकरणे चालवण्यासाठी तज्ज्ञांचे पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. या मशीनद्वारे दर तासाला 5 टन ढिगारा काढण्याची क्षमता आहे. त्यामुळे याद्वारे लवकरात लवकर खोदकाम करुन कामगारांना बाहेर काढणे शक्य होणार आहे.



या मशीनद्वारे बोगद्याच्या कोसळलेल्या भागाचा ढिगारा काढण्यात येत आहे. तसेच या कामासाठी काही विदेशी तज्ञांचीही मदत घेतली जात आहे. एनएचआयडीसीएलचे संचालक अंशू मनीष खाल्को यांनी सांगितले की, ढिगाऱ्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत.तथापि, ते म्हणाले की, अत्याधुनिक कामगिरी असलेले ‘ऑगर ड्रिलिंग मशीन’मुळे आम्हाला 50 मीटर लांब मीटर ढिगाऱ्यातून ड्रिलिंग करून येत्या सुमारे १२ तासांत मजुरांची सुरक्षित सुटका करायची आहे. मिळालेल्या माहितीनुसार,900 मिमी व्यासाचे लोखंडी पाइप सोमवारी रात्री उशिरा सिल्क्यारा बोगद्याच्या ठिकाणी आणण्यात आले. मशीन मार्फत ड्रीलिंग करून त्या मोकळ्या पाईप मधून मजुरांना बाहेर काढण्याचा प्लॅन तयार आहे.



या सर्व ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येत आहे . तसेच उच्च प्रतीची संदेश यंत्रणा मजुरांच्या आवाजाचा व हालचालींचा वेध घेऊन त्यांना अन्नपाणी व काही औषधे दिली जात आहेत,त्यांचे मनोधैर्य वाढवण्यात येत आहे. दरम्यान, उत्तरकाशी बोगदा दुर्घटनेच्या चौकशीसाठी उत्तराखंड सरकारने सहा सदस्यीय तज्ज्ञ समितीची स्थापन केली आहे. हा 4.5 किमी चा बोगदा तयार करून उत्तरकाशी जिल्ह्यातील यमुनोत्रीच्या सिल्क्यारा आणि पोलगाव गावांदरम्यान रस्ता बांधला जात आहे. या बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर उत्तरकाशी आणि यमुनोत्री दरम्यानचे प्रवासाचे अंतर २६ किमीने कमी होणे अपेक्षित आहे. या ठिकाणी बोगदा खणताना भूरचना इतर अतीसुरक्षित आपत्कालीन नियोजन केले नसल्यामुळे अशी घटना घडली आहे, असे तज्ञाचे मत आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles