नवी दिल्ली : गॅस सिलिंडरच्या किमतीबाबत एक दिलासा देणारी बातमी आहे. इंधन कंपन्यांनी गुरुवारी, 16 नोव्हेंबर रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. गॅस सिलिंडरचे दर कमी झाले आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत.
याशिवाय घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतींबद्दल बोलायचे झाले तर त्यात कोणताही बदल झालेला नाही. 14 किलोच्या सिलिंडरचे दर कायम आहेत. सरकारी तेल कंपनी IOCL ने आजपासून म्हणजेच 16 ऑक्टोबरपासून गॅस सिलिंडर स्वस्त झाले आहेत. यावेळी तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 57.50 रुपयांनी स्वस्त झाली आहे.दिवाळीच्या आधी म्हणजेच 1 तारखेला व्यावसायिक सिलिंडरचे दर 101.50 रुपयांनी वाढले होते.
त्यामुळे आता 19 किलोग्राम व्यावसायिक सिलिंडरची नवी दिल्लीमधील किंमत 1 हजार 775 रुपये, कोलकातामधील किंमत 1 हजार 885 रुपये, मुंबईतील किंमत 1 हजार 728 रुपये आणि चेन्नईमधील किंमत 1 हजार 942 रुपये असणार आहे. कंपन्यांनी 15 नोव्हेंबरच्या संध्याकाळी आढावा घेतल्यानंतर व्यावसायिक एलपीजीच्या किंमती कमी केल्या आहेत. त्याचबरोबर घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती कमी केलेल्या नाहीत. सामान्य ग्राहकांसाठी, 14.2 किलोचा एलपीजी सिलिंडर दिल्लीत 903 रुपये, कोलकात्यात 929 रुपये, मुंबईत 902.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 918.50 रुपयांना उपलब्ध आहे.
Lpg price : व्यावसायिक गॅस सिलिंडर 57 रुपयांनी स्वस्त
- Advertisement -