एखाद्या ऐतिहासिक पर्यटन ठिकाणी गेल्यावर तेथील पर्यटकांना माहिती देण्यासाठी गाईड उपलब्ध असतात. हे गाईड तुम्हाला त्या ठिकाणची ऐतिहासिक माहिती तसेच संदर्भ पुरवत असतात. सोशल मीडियावर सध्या अशाच एका चिमुकल्या गाईडची चर्चा होताना दिसत आहे. हा गाईड एक शाळकरी विद्यार्थी आहे.
कालू नावाच्या अस्सल इंग्रजी व इतर परदेशी भाषा बोलणाऱ्या मुलाची माहिती एका पर्यटकाने इंटरनेटवर शेअर केली आहे. गरीब घरातील हा कालू 5-6 परदेशी भाषेमध्ये ग्वाल्हेर व इतर किल्ल्यांची माहिती परदेशी पर्यटकांना त्यांच्या भाषेत देतो.
त्याने इंग्रजीत आपली ओळख सांगितली, नंतर स्पॅनिश, इटालियन, पोलिश भाषेत भारताच्या ऐतिहासिक संस्कृतीची माहिती देतो. आग्रा, दिल्ली, चेन्नई सह विविध शहरातील गडकिल्ल्यांची माहिती देताना तो इंग्रजी उच्चार कुशलतेने करतो, जगातील अशा विविध भाषा शिकल्यामुळे तो पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. पर्यटक त्याच्याकडून ऐतिहासिक माहिती घेण्यासाठी उत्सुक असतात.


