Wednesday, January 15, 2025
HomeNewsब्रेकिंग : दाऊद इब्राहिमच्या साथीदारांच्या २० हून अधिक ठिकाण्यांवर एनआयएची छापेमारी

ब्रेकिंग : दाऊद इब्राहिमच्या साथीदारांच्या २० हून अधिक ठिकाण्यांवर एनआयएची छापेमारी

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीवर राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील जवळपास २० ठिकाणांवर एनआयएनं छापेमारी केली आहे. 

दाऊद इब्राहिमच्या साथीदारांच्या मुंबईतील गोरेगाव, बोरीवली, सांताक्रुझ, नागपाडा, भेंडी बाजार, मुंब्रा, भिवंडी यासारख्या २० हून अधिक ठिकाण्यांवर एनआयएने धाड टाकण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. ही सर्व ठिकाणं दाऊदचे शार्प शूटर्स, ड्रग्ज पेडलर्स यांच्याशी निगडीत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे दाऊद इब्राहिमसाठी हा मोठा दणका मानला जातो आहे. या संदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिले आहे.

खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे येथे रिक्त पदासाठी भरती, 10 जून 2022 अर्ज करण्याची अंतिम तारीख

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 13 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊदला २००३ मध्ये यूएनने जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. त्याच्यावर २५ दशलक्ष डॉलर्सचे बक्षीसही ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणात एनआयएच्या हाती महत्त्वाची माहिती लागल्याचं बोललं जात आहे.

पदवीधरांसाठी सुवर्णसंधी ! महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 195 जागांसाठी भरती

भारतीय कृषी संशोधन संस्थेत तब्बल 462 रिक्त जागांसाठी भरती, एका नामवंत शासकीय संस्थेत नोकरीची संधी

संबंधित लेख

लोकप्रिय