Wednesday, December 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : रोटरीकडून दृष्टिहीन विद्यार्थ्यांचा गौरव

PCMC : रोटरीकडून दृष्टिहीन विद्यार्थ्यांचा गौरव

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : दि ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन आणि रोटरी क्लब निगडी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता दहावी, बारावी, बीए, एमए अशा 120 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. Blind students honored by Rotary

तसेच स्वाती अवचार, उज्वला नारायण सोनी, नामदेव गरुड, दामोदर सरगम, राखी गायकवाड या अंध शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

यावेळी मंचावर रोटरी क्लब निगडीचे अध्यक्ष हरविंदर सिंग दुल्लत, रोटरी क्लब ऑफ चिंचवडचे अध्यक्ष यतीश भट, रोटरी क्लब ऑफ पुणे फॉर्च्यून चे अध्यक्ष श्रीकांत मडगे, रोटरी क्लब ऑफ उद्योग नगरीचे विवेक येवले, रोटरी क्लब ऑफ पिंपरी एलिटचे अध्यक्ष अशोक शिंदे, रोटरी क्लब ऑफ आकुर्डीचे शशिकांत शर्मा व सॅटेलाइट क्लब ऑफ इको चे धनश्री घाटे सामाजिक कार्यकर्ते शिव दत्त व अन्य मान्यवरांच्या हस्ते सत्कारार्थींना रोख रक्कम, पांढरी काठी व ज्ञानवर्धक इंग्रजी व्याकरणाचे ब्रेल लिपीतील पुस्तक भेट म्हणून देण्यात आले. 

हा उपक्रम का घेतला या मागची पार्श्वभूमी ब्लाइंड वेल्फेअरचे अध्यक्ष अरुण भारस्कर यांनी मान्यवरांना दिली. यावेळेस त्यांनी संस्थेच्या उपक्रमांची देखील माहिती मान्यवरांना दिली आणि हा घटक शाबासकी मिळण्यापासून वंचित राहतो म्हणून हा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो. 

यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष हरविंदर सिंग दुल्लत यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व आपण स्वतःला कोण स्वतःला कमी न समजता आपल्यात देखील क्षमता आहे हे सिद्ध करायला हवे कारण भाटिया नावाचे एक अंध उद्योजक आहे त्यांनी मेणबत्ती पासून आपला उद्योग सुरू केला व त्यानंतर ते आज 100 कोटींची उलाढाल वर्षाला करतात. भाटिया सारख्या अंध व्यक्तीचा आदर्श आपण घेतला तर आपण देखील खूप उच्च पदावर पोहोचू शकाल,असा विश्वास व्यक्त केला. त्यामुळे आपण अंध असल्याची न्यूनगंड न बाळगता आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता संचालक भगवान पवार, जैन सोशल परिवाराचे युवराज शहा, यांनी विशेष विशेष परिश्रम घेतले.

संबंधित लेख

लोकप्रिय