Friday, March 14, 2025
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

जनवादी महिला संघटना, घरकामगार संघटनेचा विभागीय मेळावा संपन्न

पिंपरी चिंचवड : घरकामगारांना प्रत्येक कामामागे 200 रुपये दर वाढवून द्यावा, तसे आठवड्यात एक सुट्टी मिळावी व घरात कुणी गेस्ट आला तर त्याच्या अतिरिक्त कामाचा वेगळा चार्ज द्या, या मागण्यासाठी पिंपरी चिंचवड मधील घरेलू कामगार एकत्र येऊन वेगवेगळ्या विभागात सध्या मेळावे सुरु असून काल बिजली नगर आणि व्हालेकरवडीच्या मेळाव्यात चर्चा करून वरील मागण्यासाठी प्रशसकीय पातळीवर व वेळ आल्यास आंदोलत्मक पवित्रा घेऊ, असा निर्णय घेण्यात आला.

तसेच जनवादी महिला संघटनेच्या वतीने सरकाच्या दारु (वाईन) धोरणा विरोधात महिलांमध्ये प्रचार करून महाराष्ट्रातून एक लक्ष सह्याचे निवेदन मुख्यमंत्री यांना देण्याचे असून या मोहिमेत महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करून महाराष्ट्रला दारूचे कोटार होऊ देणार नाही,असा महिलांनी एक मताने निर्णय घेतला.

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत 104 पदांसाठी भरती, 20000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी

या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी आ. भा. जनवादी महिलां संघटनेच्या नेत्या व राज्य कमेटी सदस्य अपर्णा दराडे यांनी उपस्थित राहून महिलांना महागाई वाढती बेरोजगारी व महिलावर होणारे आत्याच्यार या संदर्भात जनजागृती करून रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात आंदोलनाची तयारी ठेवावी अशा त्या म्हणाल्या.

या वेळी डी.वाए.फ. आय चे पिंपरी चिंचवड सचिव अमीन शेख, शिवराय अवलोर, नंदा शिंदे, संगीता देवळे, अशा बर्डे, रिया सागवेकर, मंगल सूर्यवंशी, लता वाव्हलकर, पलवी बिरदार, लक्ष्मी अवलोल आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 64 पदांसाठी भरती, 25000 ते 35000 रूपये पगाराची नोकरी

कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 20 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

ठाणे महानगरपालिकेत अटेंडंट, तंत्रज्ञ व अन्य पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 20000 ते 25000 रूपये पगाराची नोकरी


Related Articles

- Advertisement -

Latest Articles