नाशिक : इगतपुरी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. अधरवड येथे 10 ते 20 जणांच्या टोळक्याने कातकरी वस्तीतील तीन घरे जाळल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे यात 20 वर्षे तरुणीची हत्या करण्यात आली.
इगतपुरी तालुक्यातील अधरवड येथील कातकरी वस्तीतील पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडली. 10 ते 20 जणांच्या टोळक्याने कातकरी वस्तीतील तीन घरे जाळली. घर जाळून 20 वर्षे तरुणीची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून नागरिक भयभीत झाले आहेत.
एका टोळक्याकडून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. बारशिंगवे या भागातील हे टोळके असून तेही आदिवासी समाजाचे आहेत. जमिनीच्या वादामधून हा प्रकार झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी घोटी पोलीसांनी पंचनामा केले असून या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.
कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 20 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत 104 पदांसाठी भरती, 20000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी