सोलापूर : अक्कलकोट शहरात प्रसिद्ध असलेल्या साप्ताहिक लहुजी शक्ती परिवाराच्या वतीने समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना ‘अण्णाभाऊ साठे स्मृती पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा आदर्श सतत सर्व सामान्य माणसापुढे ठेवण्याचा या मागचा हेतू आहे. अण्णाभाऊ साठे हे महान साहित्यिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील शाहीर तसेच श्रमिक चळवळीचे प्रमुख आधारस्तंभ होते, कारण आजच्या इतिहासकाराने अण्णाभाऊ साठे यांचा खरा इतिहास लपवून, अण्णाभाऊंचे दर्शन ओळख समाजाला होऊ दिले नाही. हे दुर्दैव म्हणावे लागेल.
अण्णाभाऊ साठे महाराष्ट्राचे पर्यायाने देशाचे साहित्यरत्न, जागतिक कीर्तीचे साहित्यिक म्हटल्यास काही वावगे ठरणार नाही. त्यांचे साहित्य जगाच्या २७ देशात वाचले जात असून, त्यांची पुस्तके मराठी, सिद्धी, गुजराती, बंगाली, तामिळ, मल्याळम, उडिया इत्यादी. भाषेबरोबरच लुसी, झेक पोलीश, इंग्रजी, फ्रेंच इ. भाषेत रूपांतरित झाले आहे. त्यामुळे अण्णाभाऊ साठे हे ‘साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे’ आहेत. त्यांची प्रतिमा व प्रतिभा झोपडीतील गरिबांच्या जगण्यासाठी धडपडणारी, जीवन व्यवहारातील अनंत तगमगिंना वाचा फोडणारी, मनुष्यवैरी समाज व्यवस्थेची वाभाडे काढणारी होती. मात्र मराठी साहित्यातील अभिजन वर्गाने त्यांचे साहित्यिक मूल्यमापन समीक्षा केली नाही, त्यांना उपेक्षित ठेवण्यात आले.
‘गुलामगिरी विरुद्ध लढण्याची ताकद असलेला, दुःखद देणे आणि दारिद्र्य याचा विनाश करू इच्छिणाऱ्या, शब्दरूपी गोळ्याचे भांडाराच्या भांडार म्हणजेच अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने, येथील साप्ताहिक लहुजी शक्ती परिवाराने सामाजिक बांधिलकी स्वीकारून लहुजी, फुले, शाहू, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची बांधिलकी जोपासत साप्ताहिक लहुजी शक्ती परिवाराच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, पत्रकारिता, शाहिरी, साहित्यिक, पोलीस, कला या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना राज्य स्तरीय ‘अण्णाभाऊ साठे स्मृति पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती उपसंपादक व जण चळवळीतील नेते युवराज दाखले यांनी दिली आहे.
‘या’ मान्यवरांना पुरस्कार जाहीर
सामाजिक चळवळीत आपला ठसा उमटाविणारे, सतीश लक्ष्मण कावडे (नांदेड), किसन शेठ जाधव, लक्ष्मण शिंदे (मुंबई घाटकोपर), प्रदिप योसेफ ससाणे (अहमदनगर), जयभाऊ पारखे (अक्कलकोट), सुभाष डोंगरे (मुंबई), राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे चंद्रकांत दादा लोंढे (पिंपरी चिंचवड), देशसेवेत राहूनही समाजसेवा करणारे राजेश उबाळे (कडेगांव सांगली), गेल्या १२ वर्षा पासुन पत्रकारिता करित असून, आता सध्या झी.२४ तास मध्ये सोलापूर जिल्हा प्रतिनिधी म्हणून कर्यरत असलेले, अभिषेक आदप्पा (सोलापूर) युवराज रणदिवे (मोहोळ), उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्द अनिल गायकवाड, (पिंपरी चिंचवड), बाळासाहेब मोरे (अहमदनगर) पारंपरिक हलगी वादक लक्ष्मण जेटिगा रेड्डी (हन्नूर अक्कलकोट), शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे प्राचार्य डॉ नागेश सुर्यवंशी (विरार मुंबई), तसेच राजकुमार प्रकाश मोहिते (विरार मुंबई), शाहिरी साहित्यिक म्हणून आपला ठसा उमटविणारे डॉ.शिवाजी सटवाजी वाघमारे, पोलीस खात्यात उल्लेखनीय कामगिरी करणारे आकाश भिगारदेवे, (करकब पोलिस स्टेशन) आरक्षण अ.ब.क.ड.आरक्षणा त्याग करणारे कै.संजयभाऊ ताकतोडे यांचे मोठे बंधू हनुमंत ताकतोडे, त्याग मुर्ती हणमंत आप्पा ताकतोडे तसेच औद्योगिक चळवळीत मारुती सुर्यवंशी हे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अशा युक्तीना राजकीय राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे स्मृती पुरस्कार उपसंपादक लोकसेवक युवराज दाखले यांच्या बरोबर चर्चा करून घोषित करण्यात आल्याचे संपादक सुभाष रणदिवे यांनी सांगितले.
स्मृतिचिन्ह गौरव पत्र, शाल, श्रीफळ, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सदर पुरस्कार वितरण एका भव्य समारंभात मान्यवरांना गौरविण्यात येणार असल्याची माहिती रणदिवे यांनी दिली आहे. यावेळी निवृत्ती पारखे, अनिल गवळी, नामदेव शिरसागर (डि.एस.एस.तालुका अध्यक्ष) दगडू पारखे, अंबादास कांबळे, युवा नेते भाऊ खवळे, सुधाकर गायकवाड, गणेश कांबळे इत्यादी उपस्थित होते.