जुन्नर (पुणे) : तालुक्यातील वीज ग्राहकांची आणि शेतकऱ्यांची दिलेली वाढीव वीज बिले कमी करण्याची मागणी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने महावितरणचे उप अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तालुक्यातील असंख्य नागरिकांची वीज बिले ही वाढीध आलेली आहे. कोरोनाच्या काळात अनेकांना बिल येऊन सुध्दा महावितरणाने सरासरी वीज बिले दिली आहेत. त्यामुळे ही वी बिले कमी करण्याची मागणी किसान सभेने केली आहे .
निवेदनामध्ये म्हटले आहे की, लॉकडाऊन काळापासून जुन्नर तालुक्यातील वीज धारकांना सरासरी वाढीव बीले आलेली आहे. तसेच समायोजन नावाखाली मोठी रक्कम बिलात दिली जात आहे. ही विद्युत महामंडळाने दुरूस्त करू द्यावी आणि ग्राहकांची लूट थांबविण्याची मागणी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास ३० जानेवारी रोजी महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे तालुका सचिव लक्ष्मण जोशी, अक्षय रघतवान यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.