Wednesday, February 5, 2025

फेसबुकने #ResignModi हा हॅशटॅग केला होता ब्लॉक ; फेसबुक मोदी सरकारला वाचवतेय का?

नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भयंकर रूप धारण केले आहे. देशातील आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. कोरोनाची आणखी हाताबाहेर चाललेली परिस्थिती आणि अपुरी पडणारी सरकारी यंत्रणा पाहून लोकांचा राग अनावर होत आहे. त्यामुळे काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोदींच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जाते आहे. मात्र, 28 एप्रिल रोजी फेसबुकने हा हॅशटॅग काही काळासाठी ब्लॉक केला असल्याचे समोर आले होते.

ट्विटर आणि फेसबुकवर #ResignModi हा हॅशटॅग सातत्याने चालविण्यात येत आहे. फेसबुकने #ResignModi हा हॅशटॅग ब्लॉक केल्यानंतर सोशल मीडियावर 12,000 पेक्षा जास्त पोस्ट दिसणे बंद झाले होते. या पोस्टमध्ये कोरोना महामारीच्या काळात सरकारच्या अपयशाबद्दल टीका करण्यात आली होती. 

फेसबुकने हा हॅशटॅग ब्लॉक केल्या नंतर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी ट्विटरवर उडी घेतली आणि या घटनेची ट्विटरवरुन तक्रार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी, हॅशटॅग #ResignModi हा कंटेट आमच्या फेसबुक कम्युनिटी स्टँडर्सच्या विरुद्ध आहे, असा मेसेज युजर्संना दिसत असल्याचे युझर्सचे म्हणणे आहे.

दरम्यान, हा हॅशटॅग तांत्रिक बिघाडी ब्लॉक झाला होता, तो हॅशटॅग पुन्हा रिस्टोर करण्यात आला आहे. हॅशटॅग ब्लॉक करण्यासाठी भारत सरकारकडून कोणतेही निर्देश मिळाले नव्हते, असे स्पष्टीकरण फेसबुककडून देण्यात आले होते.

लोकशाहीमध्ये अशा प्रकारच्या घटना चालतात का? फेसबुक मोदी सरकारला वाचवतेय का? असे अनेक प्रश्न युजर्स कडून उपस्थित करण्यात आले होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles