Thursday, February 6, 2025

डहाणू नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या सोडवा अन्यथा आंदोलन, आ. विनोद निकोले यांचा इशारा

डहाणू : डहाणू नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या ताबडतोब सोडवा अन्यथा जनतेच्या वतीने आम्हाला आंदोलन करावे लागेल, असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी मुख्याधिकारी राहूल सारंग यांना इशाराच दिला आहे.

यावेळी डहाणू नगर परिषद क्षेत्रात अपुर्ण पाणी योजना कार्यान्वित करण्याची मागणी, बरोबरच इराणी रोड बोरींगच्या पिण्याच्या पाण्याचा विषय, बस डेपो ते के. टी. नगर बंधारा करणे, जलाराम मंदीर पुलाजवळील गणपती विसर्जन व खाडीतील गाळ काढणे, डनप क्षेत्रातील पाणी टंचाई दूर करणे, कोरोना वाॅर रुम उभे करणे, काॅटेज हॉस्पीटल मधील स्वच्छता गृहांच्या साफसफाई करणे, कोरोना रुग्ण घरी मृत झाल्यास त्याच्या अंत्यविधीची व्यवस्था नगरपालिकेने करावी तसेच दिवादांडी, सतीपाडा, आगर या समुद्र किनाऱ्याच्या भागासाठी जम्बो बॅगमध्ये रेती भरून भरतीच्या पाण्यापासून संरक्षण देण्याबाबत आदी विषयांवर डहाणू परिसरातील महाविकास आघाडी चे पदाधिकारी यांच्या सह डहाणू येथील शासकीय विश्रामगृह येथे मुख्याधिकारी राहुल सारंग यांच्या समेवत सविस्तर चर्चा करून निवेदन देऊन मुख्याधिकाऱ्यांना सूचना केल्या. दरम्यान वरील सर्व विषयात मुख्याधिकारी सारंग यांनी लक्ष घालून लगेच कारवाईचे आश्वासन दिले. याप्रसंगी आमदार कॉ. विनोद निकोले यांनी लोकांच्या समस्यांवर त्वरीत कारवाई न झाल्यास आंदोलनचा इशारा दिला आहे.

यावेळी माकप कॉ. चंद्रकांत गोरखाना, डॉ.आदित्य अहिरे, कॉ.धनेश अक्रे, राष्ट्रवादीचे मिहीर शहा, सईद शेख, समी पीरा, रवी फाटक, शैलेश राकामुथा, चाफेकर पारेख, काँग्रेस चे संतोष मोरे, सुधाकर राऊत, समर्थ मल्हारी, हाफीझु खान, बविआ चे रईस मिर्झा हे उपस्थित होते.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles