Thursday, February 6, 2025

आंबेगाव : आदिवासी महिलेच्या हत्येतील गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना यश

आंबेगाव (पुणे) : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात एका महिलेची हत्या करण्यात आल्याचे समोर आले. पोलीस प्रशासनाने संशयित आरोपींना अखेर अटक केली आहे.

भाजी आणायला जाते असे घरातून सांगून गेलेल्या द्रौपदाबाई गिरे यांची हत्या करण्यात आली. द्रौपदाबाई गिरे यांचा मृतदेह डोक्यावर इजा झालेल्या अवस्थेत आढळला. आदिवासी समाजाच्या द्रौपदाबाई मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. पण आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावात त्या सध्या वास्तव्यास होत्या. इथंच शेतात राबून उदरनिर्वाह करायच्या. काल रात्री त्यांना एक फोन आला आणि त्या पाहुणे आले आहेत. त्यांनी भाजीपाला आणला आहे तो जाऊन त्यांच्याकडून घेऊन येते असे सांगून घराबाहेर पडल्या. 

हे पण वाचा ! आंबेगाव : अखेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या हत्येतील गुन्हेगारांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

बराचवेळ त्या घरी परतल्या नाहीत म्हणून शोध घेतला असता, जवळच रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह आढळला. पोलिसांंनी तपास सुरू केल्यानंतर सुत्रांकडून तपास लावण्यात येथ आले. या हत्येच्या गुन्ह्याखाली सुनिल हुतांबरे व शिवनाथ मधे यांना अटक करण्यात आली आहे. 

स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण व मंचर पोलीस यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहे. मंचर पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक सुधाकर कोरे, साहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे, पोलीस उपनिरीक्षक सागर खोबाले, पोलीस नाईक नवनाथ नायकवडी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक अमोल गोरे, सचिन गायकवाड, काशिनाथ राजापुरे, पोलीस नाईख दिपक साबळे, अजित भुजबळ, मंगेश ठिगळे व अन्य सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles