हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीवर निवडून आल्याबद्दल नानासाहेब आबनावे यांचा सत्कार
आळंदी / क्रांतीकुमार कडुलकर : येथे धार्मिक शिक्षण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी येत असून त्यांची व इथे येणाऱ्या भाविक भाविकांची उपासमार होत असून त्यांची जेवण्याची व्यवस्था व्हावी, या साठी समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा आळंदी देवाची येथे रोज ५०० लोकांसाठी भोजन देण्यासाठी लवकरच अन्नछत्र सुरू करणार आहोत. मी स्वतः आळंदी मध्ये धार्मिक शिक्षण घेतले असून, मधुगिरी व भिक्षा मागून मी आयुष्य जगलो आहे त्याकाळी एक वेळ उपाशी राहून आम्ही शिक्षण घेतलेे. मराठवाडा, खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातून आजही अनेक विद्यार्थी आळंदीमध्ये कीर्तनकार होण्यासाठी व धार्मिक शिक्षण घेण्यासाठी येतात. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे वारकरी विद्यार्थ्यांवरती उपाशी राहण्याची वेळ येऊ नये, यासाठीही अन्नछत्र सुरू करणार आहोत, अशी माहिती कामगार नेते बाबा कांबळे यांनी दिली.
समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा आळंदी देवाच्या वतीने आळंदी येथे विशेष सर्वसाधारण सभा व कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक म्हणून निवडून आल्याबद्दल नानासाहेब आबनावे व धर्म शाळेतील सभा मंडप पत्रा शेड कामकाज पूर्ण करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरवठा केल्याबद्दलयांचा श्रीरंग आबनावे यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बाबा कांबळे उपस्थित होते. यावेळी आपले अध्यक्ष भाषणात यांनी मनोगत व्यक्त केले.
व्हिडिओ पाहण्यासाठी :
यावेळी संत रोहिदास विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, ग्राहक संरक्षण समितीचे माजी अध्यक्ष सूर्यकांत गवळी, हवेली पंचायत समितीचे माजी सभापती किसनराव गाडेकर, दलित मित्र सुदाम लोखंडे, राष्ट्रीय स्वाभिमानी चर्मकार संघाचे अध्यक्ष सुरेश पोटे, दिंडी नंबर २४ चे अध्यक्ष सुरेश सोनवणे, घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक उत्तम सोनवणे, धर्मशाळेचे वरिष्ठ उपाध्याध श्रीरंग आबनावे, दिल्ली नंबर २४ चे विनय करी,
ह.भ.प रामकृष्ण खाडे महाराज, जयदेव ईश्वर, विकास वाघमारे, व्यासपीठावरती उपस्थित होते.
लवकरच आळंदी देवाची येथे आषाढी वारी सुरू होत असून आषाढी वारीच्या निमित्ताने दिंडी नंबर २४ चे नियोजन भोजनाची व्यवस्था व इतर व्यवस्था याबद्दल देखील यावेळी चर्चा करण्यात आली. संत ज्ञानेश्वर मंदिर मध्ये अधिक गर्दी होऊ नये यासाठी वारकऱ्यांची संख्या कमी करण्यासंदर्भात शासन नुकतेच दिंडी प्रमुखांना काही बंधन घालत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करण्याचे सूचना देखील या मीटिंगमध्ये करण्यात आले.
यावेळेस सत्कारास उत्तर देताना नानासाहेब आबनावे म्हणाले, हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती वरती मी आणि आमचे एक सहकार्य निवडून आले. बाकी सर्व पॅनल विरोधी गटाचा आला. मी काम केलं आणि माझा जनतेशी संपर्क होता, म्हणून मी निवडून आलो. वारकरी संप्रदायाच्या वतीने हा जो माझा सन्मान होत आहे, हा घरचा सन्मान आहे. मी या सन्मानाबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो.
यावेळी ज्ञानेश्वर कांबळे म्हणाले, आळंदी ही पवित्र आणि पावन भूमी आहे, संत परंपरेने समाजातील चुकीचा परंपरा रूढी वरती प्रबोधन करून समाज सुधारण्याचे काम केले आहे. या ठिकाणी सर्व संतांचे धर्मशाळा व मंदिर आहेत संत रोहिदास महाराज यांचे देखील या ठिकाणी भव्य असे मंदिर उभे राहावे यासाठी सर्व मिळून प्रयत्न करु.
सूर्यकांत गवळी म्हणाले, समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा ही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराच्या अगदी समोर आहे. धर्मशाळेचा विकास व्हावा यासाठी आपण प्रयत्न करूया, यासाठी समाजातील एकोपा महत्त्वाचा आहे सर्वांनी एकजुटीने काम केल्यास हे शक्य आहे.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/05/b0e0f62e-24ca-4401-965d-7bfbf2c23037-1024x576.jpg)
श्रीरंगदादा आबनावे म्हणाले, मी गेल्या पंधरा वर्षापासून या संस्थेचा अध्यक्ष आहे. या काळात आम्ही खूप काम केले. लाखो रुपये एफडी स्वरूपात बँकेत ठेवल्या इमारतीचे काम केले. वारकऱ्यांची सेवा केली आता नवीन तरुणांकडे सूत्र देत असून बाबासाहेब कांबळे हे अध्यक्ष झालेले आहेत. ते धर्मशाळेचा चांगल्या पद्धतीने विकास करतील असे आम्हाला अपेक्षा आहेे, यामुळे त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे.
यावेळी समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा वरती नियुक्त झालेल्या नवनिर्वाचित विश्वस्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये, अध्यक्ष बाबासाहेब कांबळे, कार्याध्यक्ष नानासाहेब आबनावे, उपाध्यक्ष श्रीरंगदादा आबनावे,सुरेश गाडेकर, तुषार नेटके, डॉ.किसन कांबळे, सचिव अनिल सातपुते, खजिनदार बबनराव पटेकर, सहखजिनदार सोपान गवळी, सुरेश सोनवणे श्रीभाऊ काळे, सुखदेव सूर्यवंशी, नंदकुमार सोनवणे, संतोष पाचारणे, सुखदेव आबनावे, सुभाष जाधव, दत्तात्रय शिंदे, मनोहर सोनटक्के, भारती चव्हाण, सोनाली देशमुख खरात, अनुपमा नेटके, मधुरा डांगे, आदींचा यावेळी शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला,
कार्यक्रमाच्या संयोजनासाठी, धर्मशाळेचे पुजारी नारायण गाडेकर, गणेश नेटके, विश्वनाथ नेटके, दीपक कांबळे, सूर्यकांत भोसले, बाबासाहेब हनवते, दत्तात्रय खाडे, यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव अनिल सातपुते यांनी केले, आभार खजिनदार बबन पटेकर यांनी मानले, प्रस्तावना सुरश सोनवणे यांनी केली.