Wednesday, February 12, 2025

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न

हडपसर / डॉ. अतुल चौरे : शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत. त्याला आपण सामोरे गेले पाहिजे. विद्यार्थी घडविणारे शिक्षक होते म्हणूनच आम्ही घडलो. असे विचार माजी विद्यार्थी समितीचे अध्यक्ष डॉ.रोहिदास जगताप यांनी व्यक्त केले. ते एस.एम. जोशी कॉलेजमध्ये माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.एन. एस. गायकवाड म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीतून महाविद्यालय नावारुपाला आले आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा सामाजिक व शैक्षणिक वारसा आपण सर्वांनी जोपासला पाहिजे. असे विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत माजी विद्यार्थी समितीचे चेअरमन डॉ.अतुल चौरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ.शहाजी करांडे यांनी केला. याप्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉ.किरण काळे, डॉ.राजेश शिर्के, सुधा भोसले, शुभम काशीद, मिलिंद सरोदे, अविनाश मोरे, अमित बादल, राहुल नागरगोजे, बालाजी मगर, गौरव नेवसे, नवनाथ सुर्वे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रेखा कराड यांनी केले. तर आभार प्रा. संगीता यादव यांनी मानले. कार्यक्रमासाठी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, बीबीए व बीसीए विभागातील 150 पेक्षा अधिक माजी विद्यार्थी उपस्थित होते.

हे ही वाचा :

सर्वात मोठी बातमी : पुणे जिल्ह्याचं विभाजन होणार ? नव्या जिल्ह्याचं नाव शिवनेरी ?

जुन्नर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आंदोलनाचा आमदार अतुल बेनके यांचा इशारा

व्हिडिओ: दिल्ली मेट्रो मध्ये जोडप्याचे व्हायरल लीप लॉक पाहिले का ?

देशातील लोकशाहीची वेगाने अध:पतनाच्या दिशेने वाटचाल – डॉ.विश्वंभर चौधरी

नागपूर येथे महाराष्ट्र पोलीस विभाग अंतर्गत भरती

High Court : उच्च न्यायालयात 1778 पदांसाठी भरती

लग्नातील जेवणाच्या पंगतीत वाढप्यावर चाकूहल्ला कारण एकूण थक्क व्हाल

Related Articles

- Advertisement -

Latest Articles