---Advertisement---
नागपूर : राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे रामटेक तर्फे मनसर वृध्दाश्रमात बिस्किट, फळे व नास्ता वाटप करून विविध भागात वृक्षारोपण करुन साजरा करण्यात आले.
---Advertisement---
मनसे रामटेक तालुका अध्यक्ष शेखर दुंडे यांचे नेतृत्वाखाली साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी मनसर वृध्दाश्रमात अबालवृध्दांना बिस्किटे, फळे व नास्ता देऊन तसेच वृध्दाश्रम परिसरात व इतर ठिकाणी विविध प्रजातीच्या ७० झाडांचे वृक्षारोपणासह कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी बंडु वैरागडे विधानसभा अध्यक्ष मौदा, राजेश देवतळे मौदा तालुका संघटक, देवा महाजन उपतालुका अध्यक्ष रामटेक, मनोज पालीवार उपतालुका अध्यक्ष, पिटु शुक्ला उपशहरप्रमुख, आकाश वाडगुरे, रमेश उमरकर, मनिष खडसे, अमोल माडकवार, योगेश बोहरा हे उपस्थित होते.