Friday, March 14, 2025

‘आमदार हरवले आहेत’, या पोस्टरने शहरात खळबळ

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

आमदार प्रताप सरनाईक यांंचे मतदारसंघात पोस्टर

ठाणे : “ओवळा – माजीवाड्याचे आमदार हरवले ! आपण त्यांना पहिलंत का?” अशा आशयाचे पोस्टर शिवसेनेचे नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघात लागले आहेत. सध्या नागरिकांमध्ये हा चर्चेचा विषय असून या पोस्टरवर कोणाचेही नाव नसून “सामान्य मतदार” असे लिहिण्यात आले आहे. त्यामुळे यामागे कोण आहे. हे अद्यापपर्यंत समोर आलेले नाही.

प्रताप सरनाईक हे गेली तीन महिने मतदार संघात नाहीत, आमचे आमदार हरवले आहे अशा आशयाचे पोस्टर प्रताप सरनाईक यांच्या मतदार संघात चर्चेचा विषय ठरला आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे प्रताप सरनाईक हे सतत विरोधकांच्या रडारवर राहिले आहेत. मध्यंतरी त्यांच्या मुलाची ईडीने चौकशी केली होती. 

त्यानंतर प्रताप सरनाईक माध्यमांपासून बऱ्यापैकी लांब असल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर ठाण्यात विविध ठिकाणी हे पोस्टर लावण्यात आल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles