Saturday, April 27, 2024
Homeआंतरराष्ट्रीयभारताचे माजी धावपटू मिल्खा सिंग यांचे ९१ व्या वर्षी दुःखद निधन

भारताचे माजी धावपटू मिल्खा सिंग यांचे ९१ व्या वर्षी दुःखद निधन

चंदीगड : ‘फ्लाईंग सिख’ अशी ओळख असलेले भारताचे माजी धावपटू मिल्खा सिंग यांचे ९१ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. गेल्या महिन्यात मिल्खा सिंग यांना करोनाचा संसर्ग झाला होता. यानंतर त्यांना मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिल्खा सिंग यांच्या जाण्यामुळे संपूर्ण क्रीडाविश्वात आणि देशात शोककळा पसरली आहे. 

रुग्णायलातील आठवडाभर उपचारानंतर त्यांना घरीही सोडण्यात आले होते. घरी परतल्यावर त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली होती, त्यानंतर त्यांना पुन्हा पीजीआयएमईआर (PGIMER) चंदीगडमध्ये दाखल केलं होतं. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरद्वारे शोक व्यक्त करत मिल्खा सिंग यांना आदरांजली वाहिली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल मिल्खा सिंग यांचे करोनामुळे निधन झाले होते. त्या ८५ वर्षांच्या होत्या.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय