Saturday, March 15, 2025

आंबेगाव : मेनुंबरवाडी (असाणे) गावात आज कोरोना लसीकरण संपन्न

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

आंबेगाव : आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील मौजे मेनुंबरवाडी (असाणे) गावात आज कोरोना लसीकरण संपन्न झाले. या लसीकरणास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. 

मौजे मेनुंबरवाडी (असाणे) येथे १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे पहिला ढोस व ४५ वर्षा वरील नागरिकांचा दुसरा ढोसचे लसीकरण संपन्न झाला. यावेळी १०९ लोकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. त्यामध्ये पहिला ढोस ७१ नागरिकांनी घेतला. व दुसरा ढोस ३८ नागरिकांनी घेतला.

यावेळी बिरसा ब्रिगेड आंबेगावचे उपाध्यक्ष दिनेश गभाले, पोलिस पाटील संतोष गभाले, सरपंच मीरा गभाले, सदस्य दिपक गभाले उपस्थित होते.

यावेळी लसीकरणाचे काम प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका पुष्पा भंडलकर, सुपरवायझर वंदना तळपे, आशा सेविका वंदना पोटे, ॲबुलन्स ड्रायव्हर राजू राऊत यांनी पाहिले तसेच नागरिकांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles