Thursday, August 11, 2022
Homeजिल्हापिंपरीत ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपचे आंदोलन

पिंपरीत ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपचे आंदोलन

spot_imgspot_imgspot_imgspot_img

पिंपरी : महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपतर्फे आज (शनिवारी) राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. पिंपरीतही चक्काजाम आंदोलन सुरू झाले आहे. कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत.

पिंपरीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनात महापालिकेतील पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

“राज्य शासनाची खेळी, ओबीसी आरक्षणाचा बळी”… ओबीसीके सन्मान मे, भाजप मैदान मे”, “ऊठ ओबीसीजागा हो, एकजुटीचा धागा हो”, निर्वाचित निवडणूक निरस्त करून ओबीसी संपवायचा राजकीय डाव?, असे फलक कार्यकर्त्यांनी हातामध्ये घेतले आहेत.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय