पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:मराठी नवीन वर्षाचे स्वागत करताना अनेक ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या. यावेळी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत अनेक जणांनी आपल्या पारंपरिक वेशात मराठी नववर्षाचे स्वागत केले.
गुढीपाडवा नववर्ष स्वागत यात्रा संस्कृती संवर्धन व विकास महासंघ यांच्या समन्वयातून गेली २१ वर्षांपासून गुढीपाडवा शोभायात्रा काढण्यात येतात. दरवर्षी पिंपरी चिंचवड शहरातील असंख्य नागरिक या शोभायात्रेत सहभागी होऊन मोठ्या उत्साहाने गुढीपाडवा उत्सव साजरा करतात. यावर्षीही बुधवारी महात्मा फुलेंनगर,संभाजीनगर,कृष्णानगर येथे सकाळी व काही ठिकाणी सायंकाळी शोभायात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाल्या.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/03/IMG-20230324-WA0005-1024x471.jpg)
शोभायात्रेत प्रभू रामचंद्र,साईबाबा, गाडगे महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पोषाख परिधान केलेले तरुण सहभागी झाले होते. ही शोभायात्रा प्रतिवर्षीप्रमाणे शोभा यात्रेत शहरातील २५ ठिकाणी भव्य रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. परिसरातील मुलांचे लेझीम पथक, ढोलताशा पथकाचे वादन नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.
२५ ठिकाणी निघालेल्या शोभायात्रेत अनेक ठिकाणी कुठे बुलेट, कुठे दुचाकी तर कुठे पायी शोभायात्रा काढण्यात आली. काही ठिकाणी शोभायात्रेमध्ये अश्वही होते. लुगडे, कपाळावर भल्ले मोठं कुंकू आणि नाकात नथ अशा मराठमोळ्या वेशभूषेत यामध्ये महिलांनी सहभाग नोंदवला.
पिंपरी चिंचवडकरानी मोठ्या संख्येने उत्साहात श्रीरामाचा जयघोष करीत या शोभायात्रेला हजेरी लावली.अशी माहिती संस्कृती संवर्धन व विकास महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ.अजित जगताप,शिवानंद चौगुले,कोषाध्यक्ष विकास देशपांडे यांनी दिली.