पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: महानगरपालिकेने मिळकतकर वसुलीची जोरदार मोहीम हाती घेतली आहे.एक लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या नागरिक,व्यावसायिक,कंपन्या,मॉल,शैक्षणिक संस्था यांची नावे आता वर्तमापत्रात प्रसिद्धी केली जात आहेत.
शास्तीकर माफीच्या आदेशानंतर मिळकत कर विक्रमी वसुली होत आहे.
खासगी कंपन्यांसह शासकीय संस्थां,रुग्णालये,व्यापारी संकुले,राजकीय नेते,माजी नगरसेवक ईई थकबाकीदाराना नोटिसा देण्यात आल्या आहेत.
टाटा मोटर्स कंपनीकडून 148 कोटी 79 लाख 64 हजार 189 रुपयांची थकबाकी असल्याने टाटा मोटर्स कंपनीलाही नोटीस बजावण्यात आली आहे.
नोटीस देऊनही प्रतिसाद न दिलेल्या 1 हजार 200 मिळकती सील लावून जप्त करण्यात आल्या आहेत.आतापर्यंत 700 कोटींची वसुली झाली आहे. अजून, जप्तीची कारवाई सुरू असून, ती एप्रिल महिन्यातही कायम राहणार आहे.एप्रिल महिन्यात जप्त केलेल्या मिळकतींचा लिलाव केला जाणार आहे,असे पालिकेच्या करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.
अधिकाधिक करवसुलीसाठी विविध प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. टाटा मोटर्स कंपनी व्यवस्थापनाची बाजू ऐकून घेतली जाणार आहे, असे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.
राज्यसरकारच्या नवी सांगवी येथील औंध उरो रुग्णालयाकडे 5 लाख 40 हजार 951 रुपये तर महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे 26 लाख 61 हजार 528 मिळकत कर थकबाकी आहे.ही थकीत कर वसुली करण्याचे आव्हान कर संकलन विभागासमोर आहे.
टाटा मोटर्स कंपनीकडून 148 कोटी येणे थकबाकीदारांच्या यादीत सरकारी संस्था, राजकीय नेते,माजी नगरसेवक
- Advertisement -