महाराष्ट्रात पन्हाळ गडावरील सज्जा कोटी येथे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठी वीर जोडले सात’ या सिनेमाचे शूटिंग सुरू असताना एक दुर्घटना झाली.शूटिंग सुरू असताना 19 वर्षांचा नागेश खोबरे नावाचा तरुण किल्ल्याच्या तटबंदीवरून १०० फूट खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाला. जखमी नागेशवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर आहे. ही घटना शनिवार 18 मार्च 2023 रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास घडली.
नागेश शूटिंगसाठी आणलेल्या घोड्यांच्या देखभालीचे काम करत होता. मोबाईलवरचे बोलणे संपवून सज्जा कोटीच्या उत्तर बाजूच्या तटबंदीवरून चालत पुढे जात असताना नागेशचा तोल गेला आणि तो 100 फूट खाली कोसळला. तरुण तटबंदीवरून पडल्याचे लक्षात येताच काही नागरिक तातडीने दोरखंड लावून सावधपणे खाली उतरले. त्यांनी नागेशला आणखी एका दोरखंडाच्या मदतीने वर काढले. नागेशच्या डोक्याला आणि छातीला गंभीर इजा झाल्याचे लक्षात येताच त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. आधी नागेशला कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले नंतर एका खासगी हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारांसाठी नेण्यात आले. नागेशची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
महेश मांजरेकरांच्या सिनेमाचे शूटिंग सुरू असताना दुर्घटना, तरुण 100 फूट खाली कोसळला
- Advertisement -