माय मराठी, साद मराठी !भाषांचा भावार्थ मराठी बात मराठी, साथ मराठी ! जगण्याला या अर्थ मराठी
आळंदी/अर्जुन मेदनकर : महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा दिवस सर्वत्र मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. ध्यास फाउंडेशनच्या प्रशालेत मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. या सोहळ्यास प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका विद्या खराडे, गोपाल उंबरकर आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांचे स्वागत करून वि . वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रशालेतील उपशिक्षिका विद्या खराडे यांनी मराठी भाषा दिनाची माहिती देत मुलांशी संवाद साधला. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून प्रशालेत इयत्ता नर्सरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी मराठी कवितेचे सादरीकरण केले. या प्रसंगी हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. गोपाल उंबरकर यांनी विद्यार्थ्यांसाठी मौलिक विचार व्यक्त करीत मार्गदर्शन केले. उपशिक्षिका स्मिता रंधवे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन मनिषा दरेकर यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
मनसे तर्फे आळंदीत मराठी स्वाक्षरी अभियान
कै. विष्णु वामन शिरवाडकर ( कुसुमाग्रज ) यांच्या जयंती निमित्त आळंदी शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठी स्वाक्षरीचा उपक्रम श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदीर परिसरात आयोजित करून मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. या स्वाक्षरी अभियान मध्ये आळंदी परिसरातील नागरिक, मनसे कार्यकर्त्यांनी प्रतिसाद देत उपक्रम यशस्वी केला.
या प्रसंगी मनसे नेते बाबूभाऊ वागस्कर, जिल्हाध्यक्ष समीर थिगळे, मनोज खराबी, संदीप पवार, शहराध्यक्ष अजय तापकीर, मंगेश काळे, वैभव काळे, गणेश गायकवाड, सागर बुर्डे, आधार भामरे, कुणाल खोलपुरे, मंगेश कुबडे, अशोक पुरी, महादेव खेडेकर, योगेश मोरे, अभिजित गुंड, सहदेव गोरे, ज्ञानेश्वर वाढेकर, राहुल गायकवाड आदी पदादिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आळंदीत मराठी भाषा गौरव दिन साजरा
- Advertisement -