Wednesday, February 5, 2025

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा दिघी बोपखेल प्रभाग ४ चा दौरा संपन्न

दिघी : दिघी बोपखेल  प्रभाग क्रमांक ४ मध्ये प्रभाग दौरा व मिटींग संपन्न झाल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षा वैशाली काळभोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी महिलांना मार्गदर्शन केले.

यावेळी त्याच्या सोबत कार्यकारी अध्यक्षा पुष्पा शेळके, भोसरी विधान सभा अध्यक्षा मनिषा गटकळ, शहर उपाध्यक्षा ज्योती गोफने, उपाध्यक्षा सारीका ढमे, पुनम वाघ, मनिषा जढर, सविताताई धुमाळ, मेधा पळशीकर, तसेच युवती अध्यक्षा सोनाली घाडगे, दिघी बोपखेल प्रभाग अध्यक्षा प्रतिभा दोरकर, स्मिता विधाते चिटणीस पार्वतीताई साळुंखे, चिटणीस सुरेखा गवारी व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles