Thursday, January 23, 2025

नाशिक : शेतकरी कायद्याविरोधात ट्रॅक्टर रॅली निघणार, मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी असल्याची माहिती

नाशिक केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याविरोधात नाशिक मध्ये 29 ऑगस्ट रोजी ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे. ही रँली 9 रस्त्यांनी गोल्फ क्लब मैदान येथे येणार आहे. केंद्र सरकारचे 3 कृषी कायदे व प्रस्तावित वीज बिल कायद्याच्या विरोधात देशभर आंदोलन सुरू आहे. हे कायदे शेतकरी विरोधी आहेत, असा आरोप केला जात आहे.

शेतकऱ्यांना शेतमजूर बनवणारे व भूमिहीन बनवणारे आहे. उद्योगपतीच्या  घशात शेती देणारे आहेत. वीज बिल कायदा प्रस्तावित शेतकरी विरोधी व वीज सर्वसामान्य शेतकऱ्यांना सवलती हिसकावून घेणारा आहे. प्रचंड पेट्रोल डिझेल दरवाढ झाली आहे या विरोधात  नाशिक जिल्ह्याच्या वतीने नाशिक जिल्ह्यात शेतकरी समनव्य समितीच्या वतीने ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे. 

बहुजन शेतकरी संघटना, किसान सभा, अखिल भारतीय किसान सभा, किसान काँग्रेस, राष्ट्र सेवा दल व शेतकरी समनव्य समिती सहभागी होणार आहे.

नाशिक लोकसभा खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप बनकर, माजी मंत्री बबन घोलप, माजी आमदार योगेश घोलप, आमदार  सरोज आहेर, शिवसेना चे विजय करंजकर, सुधाकर बडगुजर,  काँगेस चे शरद आहेर, किसान सभा  राज्य सचिव राजू देसले, उत्तम खंडभाले, अड प्रभाकर खरोटे, अखिल भारतीय किसान सभेचे किसन गुजर, अड तानाजी जायभावे, शशिकांत उनव्हणे, नगर सेवक संतोष साळवे, प्रशांत दिवे, राजेंद्र डोखळे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे भास्कर शिंदे, राष्ट्र सेवा दल चे नितीन मते,  अड प्रभाकर वायचळे, अशोक सातभाई, सोमनाथ बोराडे, नामदेव बोराडे, अर्चना गोडसे, दत्ता गायकवाड,  बाळासाहेब कासार, नगरसेवक जगदीश पवार, सुनील बागुल, विष्णुपंत गैयखे, भाऊसाहेब शिंदे, शिवराय रसाळ, कृष्णा भगत, अड नितीन ठाकरे, जयश्री खरजुल, सुदाम बोराडे, शिवाजी म्हस्के, वसंत कावळे, नाना सरवते,  बाळासाहेब म्हस्के, भास्कर गोडसे व अन्य शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी 29 ऑगस्ट रोजी भव्य ट्रॅक्टर रॅली यशस्वी करण्यासाठी निर्धार करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अशोक खालकर होते. रमेश औटे यांनी सूत्रसंचालन केले प्रास्ताविक राजू देसले यांनी केले, आभार निवृत्ती अरींगळे यांनी व्यक्त केले.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles