पवईमाळ : श्री विठ्ठल प्राथमिक विद्यामंदिर भिकोबानगर तालुका बारामती जिल्हा पुणे येथील शाळेने यशवंतराव चव्हाण आंतरशालेय जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धा 2022 23 मध्ये द्वितीय क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादित केले आहे.

या स्पर्धेत तालुक्यातून निवडण्यात येणाऱ्या उत्तम नाट्य कला जिल्हास्तरीय साठी पात्र ठरल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने सामाजिक प्रबोधनावर आधारित नाटके सादर करण्यात आली होती. सहभागी सर्व कलाकारांचे तसेच शिक्षकांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
नाट्य स्पर्धेतील सहभागी कलाकार : सर्वज्ञा शिंदे ,सिद्धी जाधव, श्रीशा सोनवणे ,राधिका खलाटे ,सार्थकी शिर्के ,आदिती कोकरे, जानवी नाळे ,स्वरा खलाटे, अमृता घुले ,साक्षी कोंढाळकर, अक्षरा खलाटे ,शरण्या कदम , प्रियल चव्हाण या विद्यार्थिनी सहभागी झाल्या.

मुख्याध्यापक विजयकुमार डांगे, सचिव शिवाजी जगताप ,अध्यक्ष अरविंद दादा विठ्ठलराव जगताप यांच्यासह दिग्दर्शक श्रीमती रेपाळे शांता काशिनाथ, सौ अनिता वैभव कोकरे व सर्व शिक्षक वृंद यांनी ही स्पर्धा यशवी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.