‘गिनीपिग’ ही डाव्या आंबेडकरी चळवळींना अज्ञात असलेल्या प्रदेशाची भाषा करणारी कादंबरी – संजय पवार
नाशिक : ‘गिनीपिग’ या कादंबरीमध्ये आलेला संपूर्ण विस्तार हा डाव्या आणि आंबेडकरी चळवळ इन साठी अज्ञात असा आहे. भाषा वांग्मय मूल्य आणि सामाजिक आर्थिक आणि राजकीय घडामोडी यांच्या व्यामिश्र मांडणीतून ही कादंबरी उलगडत जाते. जी अनेक अर्थाने आजच्या काळातली मराठी साहित्यातील अत्यंत महत्त्वाची आणि उल्लेखनीय कादंबरी येत्या पुढील काळात ठरेल असा मला विश्वास वाटतो असे प्रतिपादन नाटककार चित्रकार तथा चित्रपट पटकथा लेखक संजय पवार यांनी परशुराम साईखेडकर येथे झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केले.
या कार्यक्रमात चर्चेत म्हणून डॉ. शंकर बोराडे तसेच विष्णुपंत गायखे त्याच्यावर प्राध्यापक गंगाधर आहिरे यासह चळवळीतील अनेक लोक उपस्थित होते. संजय पवार यांनी आपल्या भाषणामध्ये साहित्य प्रवाह आणि त्यांतील विविध प्रकार यांची चर्चा केली अन्याय अत्याचाराच्या विरोधात एक चळवळ उभी राहावी अशी अपेक्षा दलित पॅंथर च्या काळातील तरुणांना वाटे. तशी ती आज वाटत नाही हि खंत त्यांनी व्यक्त करून दाखवली त्यानंतर अ लिटल मॅगझिन पासून वेगळा होत राजकीय-सामाजिक जास्त झाला आणि साहित्यिक आणि वांग्मयीन नावापुरताच उरला असेही एक निरीक्षण त्यांनी व्यक्त केले राकेश वानखेडे यांच्या कादंबरी मध्ये आलेला विचार व्यूह हा पूर्वाश्रमीची न जुळणारा असा अभिनव असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले त्यांनी आपल्या भाषणामध्ये देशीवाद कृषी वाद दलित साहित्य चळवळ स्त्रीवाद यांचा आढावा घेत घेत या कादंबरीचे सर्व काटपदर उलगडवून दाखवले.
चर्चक म्हणून बोलताना विष्णुपंत गायखे यांनी शेतकऱ्यांचे आजचे प्रश्न त्याचबरोबर ग्लोबलायझेशनमुळे निर्माण झालेली सामाजिक गुंतागुंत यावरचे अत्यंत मार्मिक असे कादंबरीतील उतारे यावेळेस व्यक्त करून दाखवले आणि म्हणून आजच्या प्रश्नांना भिडणारी कादंबरी म्हणून त्यांनी आपलं मत या ठिकाणी व्यक्त केले. त्याचबरोबर प्राध्यापक डॉक्टर शंकर बोराडे यांनी या कादंबरीचा परिप्रेक्ष हल्लो कल असला तरी त्याचं भाष्य मात्र ग्लोबल असल्याचे आपले एक निरीक्षण याठिकाणी व्यक्त केले समा कालाची सक्षम बांधणी करणारी कादंबरी असे त्यांनी गिनिपिक कादंबरी चे वर्णन करून नाशिक आणि आपल्या आसपासचा भूगोल अत्यंत जिवंत केल्याचे दाखले दिले त्याच बरोबर कादंबरीतील महात्मा गांधी आणि गाडगे बाबा यांच्या आपली नाळ जुळणार नायक रेखाटल्या चे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रा. गंगाधर अहिरे यांनी यांनी सर्व चर्चेचा समारोप करताना समन्वय करताना संजय पवार यांनी ज्या मुद्द्यांचा आणि सुट्ट्या सुट्ट्या प्रतिक्रियांचा सल मांडला त्याबाबतचे आपले निरीक्षण मांडून या कादंबरीचे अधिकचे बारकावे व्यक्त करताना अनेक कादंबऱ्यांचे उदाहरण देऊन आपले म्हणणे स्पष्ट केले. आंबेडकरी साहित्यकृतीतील महत्त्वाची कादंबरी असा त्यांनी या कादंबरीत म्हटले आहें. लेखक राकेश वानखेडे यांनी चर्चेमध्ये उपस्थित झालेल्या मुद्द्यांना आणि प्रश्नांना उत्तरे दिली. देवेंद्र उबाळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि प्रास्ताविकामध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वांग्मय मंडळ यांचा कार्यक्रम घेण्यामागे उद्देश स्पष्ट केला. तसेच वांग्मय यामध्ये आणि मराठी साहित्य मध्ये महत्त्वाची ठरणारी ही कादंबरी असल्याचे सांगून भाषा कादंबरीचा स्थल काल अवकाश त्याचबरोबर वांग्मय मूल्य आणि कादंबरीचा आकृतिबंध या सगळ्या बाबींवर चर्चा होण्याची गरज प्रतिपादन केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित गांगुर्डे यांनी केले त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. ज्यामध्ये करुणासागर पगारे कवी काशिनाथ वेलदोडे, समीक्षक भास्कर डोके, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते राजू देसले तसेच नाटककार भगवान हिरे आदींची उपस्थिती होती.