Wednesday, February 5, 2025

नांदेड : महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनचा जिल्हा परिषदेत २ तास ठिय्या आंदोलन

नांदेड : आज महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा) च्या वतीने घरकुल व रोजगार हमी योजनेच्या विविध प्रश्नांना घेऊन नांदेड जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले.

प्रशासनाच्या वतीने कोणीही चर्चेला आले नसल्यामुळे संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या केबिन कडे मोर्चा वळविला. मजूरांनी सुमारे दोन तास मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात  2 तास ठिय्या मांडला. संपूर्ण जिल्हा परिषद कार्यालय मजुरांच्या घोषणेने दणाणून गेला. अर्धा तासानंतर पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून मजुरांच्या मागण्या व निवेदन घेण्यासाठी खाली येण्याचे आश्वासन दिले.

हे पण पहा ! ब्रेकिंग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन मंजूर

स्थानिक विषय लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले, तसेच धोरणात्मक मुद्दे शासनाला लेखी कळविण्याचे पत्र संघटनेला देण्यात आले. यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड विनोद गोविंदवार, जिल्हा सचिव अंकुश अंबुलगेकर, जिल्हा कमिटी सदस्य माधव देशटवाड, सरुबाई सुर्वेसर, माणिक गोनशेटवाड, रावसाहेब शिंदे, सूर्यकांत बडूरे, पंढरी देशटवाड, रामराव यामावाड, राजू वाघमारे, बालाजी कल्याणपाड, वर्धिनी सविता गायकवाड यांनी आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. एसएफआयचे नांदेड जिल्हा सहसचिव कॉ.शंकर बादावाड यांनी आंदोलनास पाठींबा दिला. 

Related Articles

- Advertisement -

Latest Articles