मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मंगळवारी रत्नागिरी पोलिसांनी संगमेश्वर येथून अटक करण्यात आली होती.
राणे यांना रात्री महाड न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता पोलिसांनी राणे यांची ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने दोन्ही बाजूंने म्हणणे ऐकून घेत राणेंना रात्रीउशिरा जामीन मंजूर केला.
— Narayan Rane (@MeNarayanRane) August 24, 2021
नारायण राणे यांची सुटका झाल्या नंतर त्यांनी रात्री 12.32 च्या सुमारास एक ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली. ते ट्विट त्यांनी केवळ दोन शब्दात केले आहे. त्या ट्विट मध्ये त्यांनी “सत्यमेव जयते” एवढंच म्हटलेले आहे.
सुनावणी दरम्यान, राणे यांचे वकील अनिकेत निकम आणि भाऊ साळुंके यांनी न्यायालयात सांगितले की, नारायण राणे यांचं वय आणि प्रकृती ठीक नाही तसेच त्यांना मधुमेह, उच्चरक्तदाबाचा त्रास असल्याने यावर त्यांना औषध सुरू असल्याची देखील माहिती दिली.