Saturday, March 15, 2025

पैलवान अभिजीत कटकेने पटकावला ‘हिंदकेसरी’ किताब, राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव

महाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेने हिंदकेसरी किताब पटकावला आहे. भारतीय शैली कुस्ती महासंघाच्या वतीने हैदराबाद येथे हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा झाली. यात खुल्या गटातून अभिजीत कटके यांनी हे यश मिळवले आहे.
अभिजीत कटके यांनी अंतिम फेरीत हरियाणाच्या सोमवीरचा 5-0 असा पराभव केला आहे.

या कामगिरीने अभिजीत कटके यांच्यावर राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अभिजीत यांना यापूर्वी एकदा महाराष्ट्र केसरी तर दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी किताब पटकावला आहे. त्यानंतर आता त्याने हिंद केसरीची मानाची गदा पटकावून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय.

अभिजीत कटके हा मुळचा पुण्यातील असून येथिल शिवरामदादा तालीम येथे सराव करतो. या विजयाने अभिजीत याने महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी, रुस्तम ए हिंद दोन्ही किताब मिळवणाऱ्या दिनानाथ सिंह, दादुमामा चौगुले, हरिश्चंद्र बिराजदार, विनोद चौगुले आणि अमोल बुचडे यांच्या पंक्तीत विराजमान होण्याचा बहुमान पटकावला आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles