मोफत उद्योजकता विकास कार्यक्रमात सहभागी व्हा ! – मोहन कांडेकर
पिंपरी चिंचवड : भारत सरकारच्या स्किल इंडिया मिशन अंतर्गत अनुसूचित जाती, जमातीच्या १०० महिलांसाठी मोफत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. महिला मुलींनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशिक्षण संयोजक मोहन कांडेकर यांनी जाहीर केले आहे.
इंजिनिअरिंग क्लस्टर पुणे आणि ग्लोबल रिसर्च स्किल ट्रेनिंग इंडिया प्रा.लिमिटेड च्या संयुक्त विद्यमाने “भरत काम अर्थात हँड एम्ब्रॉयडरी, हस्तकला’ या प्राचीन कलेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. भरतकामातील विविध प्रकारचे हेरिंगबोन टाका, बटनहोल टाका, फ्रेंच नॉट, फेदर स्टिच, गाठीचा टाका, गहू टाका, काश्मिरी टाका, कांथावर्क, कर्नाटकी कशिदा टाके, नक्षीदार डिझाइन ई कलाकुसर याचे प्रशिक्षण ए सी प्रवर्गातील महिलांना देण्यात येणार आहे. इंजिनिअरिंग क्लस्टर पुणे, बर्ड व्हॅली गार्डन, एम आय डी सी चिंचवड येथे प्रशिक्षण दि.२७ नोव्हेंबर २०२१ कार्यशाळा संपन्न होणार आहे.
वय वर्षे १८ ते ४५ गटातील दहावी पास महिलांनी आवश्यक कागदपत्रांसह मोहन कांडेकर यांना (७७९८०७२३२२) संपर्क करावा.