पिंपरी दि. २६ : भारतीय राज्यघटना ही जगात सर्वात मोठे संविधान आहे स्वातंत्र्य आपल्याला प्राणांची आहुती देऊन श्रमाने, कष्टाने लोकशाही मिळाली आहे. सविधाना ला आकार येण्यासाठी अनेकानीं मोठे प्रयत्न केले आहेत, भारतीय संविधानात प्रत्येक नागरिकांच्या हिताचे, हक्काचे न्यायाची भूमिका घेतली आहे. म्हणूनच राज्यघटना जगात सर्वाधिक श्रेष्ठ आहे. या संविधानाची मूलभूत चौकट हीच जगण्याचा अधिकार आहे आणि याचा प्रसार आणि प्रचार व्हावा म्हणून राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फेआज भक्ति शक्ति शिल्प समूह निगडी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौका पर्यंत संविधान सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजोग वाघेरे, महासंघाचे अध्यक्ष, कामगार नेते काशिनाथ नखाते, बहुजन सम्राट सेनेचे नेते संतोष निसर्गंध, माजी नगरसेवक सतिश दरेकर, सामाजिक कार्यकर्ते नाना कसबे, सचिन नागणे, भिमशाही चे शिवशंकर
उबाळे, महासंघाचे कार्याध्यक्ष चौधरी, संघटक अनिल बारावकर, राजू बिराजदार, सिद्धनाथ देशमुख, अमृत माने, राजेश माने, आसिफ शेख, सलीम डांगे, सय्यद अली , शिवलिंग स्वामी, प्रदीप कोंगले, नितीन भराटे संभाजी वाघमारे, आजय गुप्ता, राजेंद्र कांबळे, उमेश डोर्ले, सखाराम केदार, यासीन शेख , अन्ना नारखेडे आदी उपस्थित होते .
संविधान सन्मान रॅलीत सुमारे २३० दुचाकीचालक सहभागी होऊन संविधानाचा जागर करत मोठ्या घोषणा देत हि रॅली शहरातील विविध भागातून पिंपरी पर्यंत पोहोचली. पिंपरी येथे प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
यावेळी संजोग वाघेरे म्हणाले संविधानाच्या बाबतीत आपण पाहत आहोत की गेल्या काही दिवसांमध्ये त्यावर घाला घालण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होत आहे. आपल्या संविधानाची महती संपूर्ण जगात आहे. डॉ. बाबासाहेबांनी जे संविधान लिहिले ते सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा पुढे जाण्याचा विचार आहे. तेच तेच विचार पुढे नेण्याची जबाबदारी तुमच्या आमच्यावर ती आहे याचे भान ठेवून आपण पुढे काम केलं पाहिजे .
नखाते म्हणाले की आपली लोकशाही आणी संविधान हे एकमेकांच्या अस्तित्वाला महत्व देणारे आहे त्याचबरोबर राष्ट्रहिताला प्राधान्यक्रम देणारे आहे. भारतीय संविधान मुळे नैतिक स्वातंत्र्य, समता आणि न्याय, बंधुता ही भारतीय संविधानाची जीवन रेषा आहे. लोकशाही राष्ट्र असल्याने त्याची जोपासना करणे सर्वांचे काम आहे. सामाजिक विचार आणि राजकीय निर्णय प्रक्रिया या दोन महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत शासन यंत्रणेच्या माध्यमातून व्यवस्था निर्माण करण्याचे काम संविधानाने केले.
यावेळी निसर्गंध म्हणाले, मूठभर लोक संविधानाबद्दल गरळ ओकत आहेत स्वातंत्र्य हे २०१४ साली स्वातंत्र्य मिळाले म्हणून स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान केला जात आहे. अशा प्रवृत्तीला ठेचण्याची गरज आहे देशाला एकसंध ठेवण्याची काम भारतीय संविधानाने केले.
प्रस्तावना अनिल बारवकर यांनी केली, सूत्रसंचालन राजाभाऊ हाके तर आभार फरीद शेख यांनी मानले.
– क्रांतिकुमार कडुलकर