बारामती : सोपान बाग बारामती येथे दुर्मिळ जातीचा मांडुळ साप आढळून आला. सोपान बाग येथे साप असल्याचे स्थानिक नागरिकांनी फोन वरून माहिती दिली. सदर माहिती सर्पमित्रांना समजताच त्यांनी तात्काळ हजेरी लावून शिताफीने साप पकडून त्याला वन विभाग बारामती येथे वन अधिकारी गोलांडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
वन रक्षकांच्या मदतीने सापाला त्याच्या परिसंस्थेत सोडण्यात आले. यावेळी वन रक्षकांनी मांडुळ जातीच्या सापाबद्दल असलेले गैरसमज समजाऊन सांगितले. जादूटोणा, अंधश्रद्धा जोपासण्यासाठी, पैशाचा पाऊस पाडण्यासाठी या सापाची तस्करी होते परंतु त्यात काही तथ्य नाही असे ते म्हणाले.
यावेळी सर्पमित्र रीतिक सरोदे , राजरत्न सरोदे, किशोर यादव, तन्मय सरोदे उपस्थित होते.